BJP Politics Behind Sengol: नेहरू, तामिळनाडू, मोदी आणि संसदेतील राजदंड; लोकसभेतल्या 39 जागांशी काय आहे संबंध!

Tamilnadu Politics: राजदंडाच्या माध्यमातून भाजप द्रविडीय राजकारण करत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
Narendra Modi : Amit shah : Sengol News
Narendra Modi : Amit shah : Sengol NewsSarkarnama

BJP Politics Behind Sengol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी पंतप्रधान ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'सेंगोल'चीही (Sengol) (राजदंड) स्थापना करणार आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री एका अनोख्या प्रक्रियेअंतर्गत ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरण म्हणून सेंगोल स्वीकारले.

हेच राजदंड आता नव्या संसद भवनात बसवले जाणार आहे. पण या राजदंडा'मागे भाजपचे (BJP) राजकारण असल्याचीही चर्चा आहे. कर्नाटक निवडणूकीत झालेला पराभव आणि दक्षिण भारतीतील तामिळनाडू, तेलंगना राज्यातील ३९ लोकसभा जागांच्या दृष्टीने भाजप'ने (BJP Politics) सेंगोलची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

Narendra Modi : Amit shah : Sengol News
Pune News : ...तोपर्यंत बालभारती ते पौडफाटा रस्त्याचं मार्किंग थांबवा! ; गोऱ्हेंची महापालिका आयुक्तांना सूचना

- लोकसभेच्या 39 जागा जिंकण्याची रणनीती

कर्नाटकातील पराभवानंतर भाजपच्या गोटातील हालचाली वाढू लागल्या आहेत. भाजपने दक्षिणेतील तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपला तामिळनाडूमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथे विरोधी पक्षाची खुर्ची रिक्त झाली आहे. (National News)

पक्षाची कमान तडफदार अण्णामलाई यांच्याकडे आहे. भाजप नेते अण्णामलाई यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रादेशिक मर्यादा ओलांडल्या आहेत. ते कन्याकुमारीतून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप तामिळनाडूमध्ये (Tamilnadu Politics) अनेक रणनीतींवर काम करत असल्याचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

Narendra Modi : Amit shah : Sengol News
Devendra Fadnavis On Ambedkar : आंबेडकरांचा 'मविआ'वरुन ठाकरेंना मोलाचा सल्ला; फडणवीस म्हणाले,''बाळासाहेब कधी कधी..''

अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी राजदंडा'ला थेट संसदेत दिलेले स्थान हे तामिळनाडूमध्ये 39 जागा जिंकण्याचा दृष्टीतून आखलेली रणनीती असू शकते, अशीही चर्चा आहे.2019 मध्ये भाजपला तामिळनाडूमध्ये 39 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. 2014 मध्ये कन्याकुमारीची जागा भाजपने जिंकली होती.

फक्त तामिळनाडूवरच का लक्ष्य करण्याचे कारण काय?

- तामिळनाडूची सीमा दक्षिण भारतातील 3 राज्यांच्या सीमेला लागून आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळचा समावेश आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 100 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे फक्त 25 आहेत. (National Political news)

- जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील विरोधक पूर्णपणे कमकुवत झाले आहेत. भाजपला आपली पाळेमुळे रोवण्याची ही सोपी संधी आहे. भाजपची जयललिता यांच्या पक्षाशी युती आहे.

Narendra Modi : Amit shah : Sengol News
Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

राजदंडाच्या माध्यमातून द्रविड राजकारण सुधारणार?

गेल्या 55 वर्षांपासून तामिळनाडूत द्रविडची सत्ता आहे. तामिळनाडून केवळ ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या पक्षच सरकार स्थापन करत आले आहे. सध्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचे सरकार आहे. केंद्रातील सत्तेतही द्रविडीयन पक्षाचा हस्तक्षेप असतो.

1998 मध्ये जयललिता यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले. 2004 आणि 2009 मध्ये करुणानिधींनी काँग्रेसला पाठिंबा देऊन सर्वांना चकित केले होते. तामिळनाडूत द्रविडीय राजकारणामुळे भाजपला तिथे मुळे रोवता आलेली नाहीत. अलीकडच्या काळात काँग्रेसची अवस्थाही बिकट होती. अलीकडेच 2 वादांमुळेही तामिळनाडूत भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com