Enforcement Directorate strengthened by central government Sarkarnama
देश

ED Strengthened : विरोधकांना धडकी भरवणाऱ्या यंत्रणेचे हात आणखी बळकट! मोदी सरकारने वाढवलं दुप्पट मनुष्यबळ

Modi government increases ED manpower : ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय हे बड्या आर्थिक गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजलं जातं. सध्या याचा मोठ्या प्रमाणावर राजकीय गैरवापरही होत असून यामुळं विरोधी नेतेमंडळींना चांगलीच धडकी भरते, या ईडीला आता मोदी सरकारनं आणखी बळकट केलं आहे.

Amit Ujagare

ED manpower increase political controversy: राजकीय विरोधकांना धडकी भरवणाऱ्या यंत्रणेचे अर्थात ईडीचे हात मोदी सरकारनं आणखी बळकट केले आहेत. अर्थ खात्यानं ईडीचं मनुष्यबळ दुप्पटीनं वाढवलं आहे, म्हणजेच येत्या काळात आता ही एजन्सी आता आणखी दुप्पट वेगानं आर्थिक गुन्हेगारांवर आपला वचक ठेवणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

बड्या आर्थिक घोटाळ्यांची ईडीकडून चौकशी केली जाते. त्यामुळं अशा घोटाळेबाजांसह केवळ राजकीय हेतून कारवाई करण्यात येणाऱ्या विरोधीपक्षातील नेत्यांनाही आता याची धडकी भरली आहे.

नेमका बदल काय?

केंद्रीय अर्थ खात्यानं ईडीच्या केडरच्या रचनेत मोठे बदल केले आहेत. प्रामुख्यानं यामध्ये अधिकारी स्तरापासून कनिष्ट स्तरापर्यंतच्या मनुष्यबळात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, उपसंचालक पदांमध्ये १४८ वरुन २६७ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

तसंच सहाय्यक संचालक पदांमध्ये देखील वाढ करण्यात आली असून २५५ वरुन ती ५३१ वर नेण्यात आली आहे. त्यानंतर अंमलबजावणी अधिकारी मदामध्ये ३५५ वरुन ६०६ इतकी वाढ करण्यात आली आहे. तर सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी पदामध्ये ४२५ वरुन ८०३ इतकी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, या महत्वाच्या पदांमध्ये वाढ करण्यासोबतच ईडीच्या रचनेमधील ७ केडरमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये लिगल केडर, अॅडज्युडिकेशन विंग, सिस्टिम्स केडर, मिनिस्ट्रिअल केडर, सिक्युरिटी केडर, सपोर्ट स्टाफ या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. या वाढील मनुष्यबळाच्या भरती प्रक्रियेसाठी, त्यांच्या पगारांपोटी निधीसाठीही मान्यता देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT