Mithun Chakraborty
Mithun Chakraborty sarkarnama
देश

भाजप करणार आणखी एका राज्यात 'ऑपरेशन लोटस'? मिथुन चक्रवर्तींच्या दाव्याने खळबळ

सरकारनामा ब्यूरो

कोलकाता : महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) भाजप (BJP) 'ऑपरेशन लोटस' करणार असल्याची चर्चा आहे. भाजप नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. भाजपने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल कॉंग्रेसचे तब्बल 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

त्याच बरोबर तृणमूल काँग्रेसचे 21 आमदार स्वत: माझ्या संपर्कात असल्याचे मिथुन चक्रवर्तीं यांनी सांगितले. मिथुन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केले. त्यामुळे आता महाराष्ट्रापाठोपाठ भाजप आता पश्चिम बंगालची सत्ताही काबीज करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, तृणमूल कॉंग्रेसच्या एकाही नेत्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते चक्रवर्तींच्या या दाव्यांचे खंडन करेल, असे मानले जात आहे. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लोकांची सहानुभूती मिळवून निवडणूक जिंकली. अशा परिस्थितीत बळजबरीने हिसकावून घेतलेल्या गोष्टी हाताळणे कठीण असते, अशी एक म्हण हिंदीत आहे. असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले. विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या तर भाजपचा नक्कीच विजय होईल, असेही चक्रवर्ती म्हणाले.

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही हे निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपकडे काही काम नाही. तीन-चार एजन्सींच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्या ताब्यात घेणे एवढेच त्यांचे काम आहे, असे त्या म्हणाल्या.

बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला. आता झारखंड ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, पश्चिम बंगाल त्यांचा पराभव करेल. बंगालला तोडणे त्यांना शक्य नाही. कारण या ठिकाणी त्यांना आधी रॉयल बंगाल टायगरशी लढावे लागेल, असे ममता यांनी भाजपला दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT