राज्यसभेतील कोंडी फुटण्याची चिन्हे : सोमवारपासून महागाईवर चर्चा सुरू?

राज्यसभेतील सभापती वेंकय्या नायडू यांनी ही कोंडी फोडण्यासाठीचा आणखी एक प्रयत्न म्हणून आज सरकारी मंत्री व विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली.
Sansad Bhavan Latest News
Sansad Bhavan Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली - राज्यसभेत महागाईवर विशिष्ट नियमांतर्गतच चर्चेची मागणी करून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्याने वर्तमान पावसाळी अधिवेशनाचे पहिल्या पूर्ण दोन आठवडयांचे कामकाज अपवाद जवळपास पाण्यात गेले आहे. मात्र सभापती वेंकय्या नायडू यांनी ही कोंडी फोडण्यासाठीचा आणखी एक प्रयत्न म्हणून आज सरकारी मंत्री व विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली. ( Signs of impasse in Rajya Sabha: Discussion on inflation to start from Monday? )

या बैठकीत पुढील आठवड्याच्या सुरवातीपासूनच (सोमवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांत महागाईवर चर्चा करण्याबाबत एक व्यापक सहमती (ब्रॉडर ॲग्रीमेंट) झाली, असे भाजप सूत्रांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोरोनातून बऱ्या होऊन संसदीय कामकाजात सहभागी झाल्याने सरकारने या विषयावर चर्चा करण्याची तारीख सांगण्याचे आवाहन विरोधकांना केले आहे.

Sansad Bhavan Latest News
राज्यसभा निवडणुकीत खेळ बिघडवलेला आमदार शहा अन् नड्डांच्या भेटीला दिल्लीत

दरम्यान, सोमवारपर्यंत सरकार व पंतप्रधान आणखी काही असा निर्णय घेणार नाहीत की ज्यामुळे संसदेत आंदोलन करण्यास विरोधकांना भाग पडेल, असा टोला एका विरोधी पक्ष नेत्याने लगावला.

नायडूंकडील या बैठकीत विरोधी पक्षनेते मल्लिकाजुर्न खर्गे आणि केसी वेणुगोपाल, सपाचे राम गोपाल यादव, तृणमूल कांग्रेसचे डेरेक ओब्रायन, द्रमुकचे तिरुची सिवा, शिवसेनेचे संजय राऊत, सीपीएमचे एल्लमारम करीम, भाकपचे विनय विश्वम आणि एमएमकेचे बिनय रेड्को सहभागी झाले होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुरलीधरन यांनीही बैठकीत भाग घेतला. दरवाढीच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास कधीही तयार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

Sansad Bhavan Latest News
राज्यसभा निवडणुकीतील 'त्या' तीन मतांमुळे शिवसेना रूसली; काँग्रेसला बसणार दणका?

राज्यसभेतील 20 खासदारांना गदारोळाबद्दल चालू आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत तरी चर्चा होणार नाही असे विरोधी पक्षनेत्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीतर्फे सुरू असलेल्या चौकशीचा सध्याचा टप्पा आज संपला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गेले 3 दिवस, 12 तास व 100 प्रश्न सोनियांना विचारण्यात आले. सोनिया व राहुल गांधी यांची पुढील चौकशी केव्हा होणार हे ईडीने स्पष्ट केलेले नाही.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की संसदेच्या दोन्ही सभागृहात सोमवारपासून कोणत्याही दिवशी दरवाढीवर चर्चा होऊ शकते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी विशिष्ट नियमाचा हट्ट मागे घेण्याची तयारी दाखविल्याने आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी चर्चा करून चर्चेचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असेही ते म्हणाले.

Sansad Bhavan Latest News
सोनिया गांधी यांच्याविरुद्धची कारवाई आवडली नाही!

दरम्यान नायडू यांच्याशी झालेल्या बैठकी दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी 20 खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी निलंबित सदस्यांची संख्या खूप जास्त आहे. संवेदनशील विषयावरील चर्चेत सदस्यांची सभागृहात उपस्थिती राहावी यासाठी निलंबन मागे घेतले जाऊ शकते, अशी सूचना नेत्यांनी केली. त्यावर निलंबित खासदारंनी सभागृहाची माफी मागितली तर निलंबन मागे घेतले जाऊ शकते असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले ती सूचना विरोधकांना मान्य होण्यासारखी नसल्याचेही लगेच स्पष्ट झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com