Mithun Chakraborty Sarkarnama
देश

BJP in West Bengal : 'भाजप जिंकला नाही, तर हिंदू बंगाली वाचणार नाहीत'; मिथुन चक्रवर्तीच्या विधानानं खळबळ

Mithun Chakraborty BJP West Bengal Hindu Bengalis Bengal politics political news India : भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकला नाही तर हिंदू बंगाली वाचणार नसल्याचं विधान केलं आहे.

Pradeep Pendhare

West Bengal political news : अभिनेता तथा भाजपचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमधील हिंदूबाबत मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. 'भाजप निवडणुका जिंकल्या नाही, तर पश्चिम बंगालमधील हिंदू बंगालमधील अस्तित्व धोक्यात येईल', असे चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

भाजपने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे तयारी सुरू केली आहे. भाजप नेत्यांचे दौरे देखील वाढवले असून, बैठकांवर भर दिला जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमध्ये बैठकांचा सपाटा लावला आहे. बैठकांमधून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्मिती करायला सुरवात केली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांनी कार्यकर्त्यांना भाषण देताना, पश्चिम बंगालमध्ये यावेळी कोणत्याही परिस्थिती आपल्याला जिंकाये असेल, तर बांगलादेशने जे दाखवून दिले, त्यातून आपण धडा घेऊन कामाला लागले पाहिजे. भाजप यावेळी जिंकला नाही, तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू (Hindu) बंगाली टिकणार नाही, असे म्हटले.

भाजप जिंकला नाही, तर भाजपला (BJP) पाठिंबा देणारे हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत. विरोधक आहेत, ते सत्तेत आहेत. ते पुन्हा सत्तेत आल्यास आपण वाचू शकत नाही, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले. निवडणुकीला जिंकायचे असेल, तर वैयक्तिक हेवे-दावे बाजुला ठेवावेत. भाजप जो उमेदवार देईल, त्याचे एकजुटीने काम करा, असेही मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले.

भाजप कार्यकर्त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये, फक्त निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करून त्या कशा जिंकता येईल, ते पाहावे. मला हे पटत नाही, आवडत नाही, यात गुंतून राहू नका. अगोदर भाजपच्या उमेदवाराला विजयी करा, पक्षाला विजयी करा, हेच आपल्यासाठी फायद्याचे ठरेल, असेही मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढत आहे. राज्यात तृणमूल काँग्रेस अजूनही मजबूत स्थितीत आहे. यातच मिथुन चक्रवर्ती यांनी केलेले हे विधान पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या अनुषंगाने एक रणनीताचा भाग असल्याचे मानले जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या या विधानाने हिंदू बंगाली समाजामध्ये आणि भाजपमध्ये चर्चांना पेव फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT