Shivsena UBT : 'नेते गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंसोबतच'; पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Sangli Politics : राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडत असताना सामान्य कार्यकर्ता मात्र शिवसेनेच्या मागे ठाम उभा असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : नुकताच जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे राज्यात एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या ऑपरेशन टायगरने स्पीड घेतल्याचे दिसत आहे. पण या प्रवाहात फक्त नेते धावत असून कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या मागे ठाम असल्याचे सांगलीत पाहायला मिळत आहे. दरम्यान मिरजमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी बैठक घेऊन कायम ठाकरेंसमवेत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाला दोन दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला होता. येथे एकनाथ शिंदे यांनी जोरदार धक्का देताना सिद्धार्थ जाधव यांच्यासह काही महत्वाचा प्रवेश करवून घेतला होता. या प्रवेशामुळे सांगलीत ठाकरे गट संपल्याचे बोललं जात आहे.

ठाकरे गटातील सामान्य कार्यकर्ते मिरजेत एकत्र येत मिरजेतील महाराणा चौकात बैठक घेतली. या बैठकीला मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, तालुकाप्रमुख संजय काटे, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे, तालुकाप्रमुख संजय काटे, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, शाकिरा जमादार, महादेव मगदूम, ओंकार जोशी, सरोजनी माळी आदी उपस्थित होते.

Shivsena UBT News
Shivsena UBT : मुंबईत 'ते' बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना घरं नाकारतात; त्यावर 'मटण'वाले 'बाल हिंदुहृदयसम्राट' बोलणार का? ठाकरे गटाने राणेंना डिवचलं

यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांसह मिरज शहर, तालुक्यातील पदाधिकारी कायम ठाकरेंसमवेत राहिल असा निर्णय घेतला. तर स्वार्थासाठी शिवसेनेत आलेले सिद्धार्थ जाधव हे मुळात शिवसैनिक नव्हते. त्यामुळे मिरजेतील सर्व पदाधिकारी ठाकरे गटाशी एकसंध आणि एकनिष्ठ असल्याचे जाहीर केले.

Shivsena UBT News
Shivsena UBT: पहावे ते नवलच! उद्धव ठाकरेंच्या खासदाराने गाठले भाजपचे कार्यालय; 'हे' आहे कारण

दरम्यान, संजय विभूते, बजरंग पाटील, बबन कोळी, मनीषा पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात, मिरज शहरात ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी येथे एकत्रित येऊन बैठक घेऊन जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंसमवेत असल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com