Lalduhoma Sarkarnama
देश

Mizoram Assembly Elections Results 2023 : पहिल्या तासातच 'झेडपीएम'ची बहुमतापर्यंत मजल; मिझोरममध्ये सत्ताविरोधी कल ?

Sunil Balasaheb Dhumal

Mizoram Elections 2023 Live Updates : मिझोरमच्या 40 विधानसभा जागांवर झालेल्या निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरातच झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम-ZPM) बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार झेडपीएमने बहुमताच्या आकड्यापर्यंत मजल मारली. पक्ष सध्या ४० पैकी २२ जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) 9 तर काँग्रेस पाच जागांवर आहे. या आकड्यानुसार राज्यात सत्ताविरोधी वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर रोजी 80.43 टक्के मतदान झाले. राज्यात सत्ताधारी एमएनएफ, झेपीएम आणि काँग्रेस या पक्षांत प्रमुख लढत आहे. भाजपने २३ जागांवर तर आपने चार जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. दरम्यान, आलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात कुणालाही बहुमत मिळणार नसून त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, २०१८ मध्ये 10 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला सरकार गमवावे लागले होते. पी. लालथनहवला यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला होता. काँग्रेसला हारवून एमएनएफने मोठा विजय प्राप्त केला होता. त्यावेळी एमएनएफला 26, काँग्रेसला 5, भाजपला 1 आणि अपक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या, तर एमएनएफचे झोरमथांगा मुख्यमंत्री झाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT