Mizoram Assembly Elections Results in Marathi : ईशान्येकडील मिझोरम राज्यात १९८४ पासून कधी काँग्रेसचे, तर कधी मिझो नॅशनल फ्रंट (MNF)चे सरकार स्थापन झालेले आहे. यंदा मात्र राज्यात एमएनएफ आणि नवा पक्ष झोरम पीपल्स मुव्हमेंट (झेपीएम ZPM) या स्थानिक पक्षांत कांटे की टक्कर आहे.
राज्याचे मुख्यमंत्री झोराम थांगा हे या वेळी आपले एमएनएफचे सरकार वाचवणार की माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील झेडपीएम पक्ष आपले पहिले सरकार स्थापन करणार, याकडे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी एमएनएफसमोर झेडपीएम या नव्या पक्षाने कडवे आव्हान दिले आहे. दरम्यान, विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझोरममध्ये त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी राज्यात काँग्रेस गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांच्या विधानसभा निकाल रविवारी आले. यानंतर सोमवारी होत असलेल्या मिझोरम विधानसभेचा निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यातील विधानसभेच्या ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली आहे.
राज्यातील या निवडणुकीत ४० जागांसाठी एकूण १७४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सत्ताधारी एमएनएफ, प्रमुख विरोधी पक्ष झेडपीएम (ZPM) आणि काँग्रेसने सर्व जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत, तर भाजपचे २३ आणि आम आदमी पार्टी चार जागांवर निवडणूक लढवत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात ?
मिझोरममध्ये सत्तास्थापनेसाठी २१ जागांची आवश्यकता आहे. एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी एमएनएफ पक्षाला ४० पैकी १४ ते १८ जागा, झेडपीएमला १२ ते १६, काँग्रेसला ८ ते १० तर भाजपला ० ते २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, चारपैकी तीन राज्यांत पोलचा अंदाज खोटा ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मिझोरममध्ये काय होणार, याची उत्सुकता आहे.
राज्याची सध्याची राजकीय स्थिती
राज्यातील सत्ताधारी एमएनएफने २०१८ मध्ये 27 जागा पटकावल्या होत्या. काँग्रेसला 4, बसपाला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.