Election Commission Sarkarnama
देश

Mizoram Election: मोठी बातमी ! मिझोरमच्या निकालाची तारीख बदलली; आता 'या' दिवशी होणार मतमोजणी

Ganesh Thombare

Delhi News: देशातील राजस्थान, मिझोरम, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक 7 ते 25 नोव्हेंबर या कालवधीत पार पडली. या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली असून मिझोरमच्या निकालाची तारीख बदलली आहे.

मिझोरमचा निकाल आता 3 डिसेंबर ऐवजी 4 डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आता एकाच दिवशी लागणार नसून मिझोरमचा निकाल हा 4 डिसेंबरला तर राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा निकाल हा 3 डिसेंबरला लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिझोरमच्या निकालाची तारीख बदलण्याचे कारणही निवडणूक आयोगाने (Election Commission) सांगितले आहे. मिझोरममधील नागरिकांसाठी रविवारचा दिवस महत्वाचा असतो. ख्रिश्चन समाजाचे नागरिक विशेषतः रविवारी चर्चमध्ये जातात. तसेच अनेकांनी 3 डिसेंबरची तारीख बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल महत्वाचे मानले जातात. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या राज्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून आता 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबरला कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, हे स्पष्ट होणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT