Tamil Nadu politics heats up as MK Stalin reacts to the growing political influence of TVK chief Vijay. Sarkarnama
देश

Tamil Nadu Political : तमिळनाडूत सरकार स्थापनेत अडचण, स्टॅलिन यांच्या भूमिकेमुळे गेमच फिरली! म्हणाले, 'सहा महिने...'

MK Stalin TVK Vijay : तमिळनाडूत सरकार स्थापनेत अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे डीएमके-एडीएमके युतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एम के स्टॅलिन यांच्या भूमिकेने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.

Roshan More

Tamil Nadu News : तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीके सत्तेच्या जवळ आहे. मात्र, 118 जागांचे बहुमतापासून आणखी पाच जागा दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा त्याने करताना राज्यपालांकडून 118 सदस्यांचा पाठींबा घेऊन या असे सांगितले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी स्टॅलिन यांची डीएमके आणि कट्टर विरोधी एडीएमके एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

डीएमके-एडीएमके एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना डीएमके प्रमुख स्टॅलिन यांची भूमिका समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृ्त्तानुसार, डीएमके विजय याला सरकार स्थापन करण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करणार नाही. पुढील सहा महिने डीएमके कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. स्टॅलिन यांच्या या भूमिकेमुळे विजयचा सत्ता स्थापनेचा रस्ता साफ झाल्याचे बोलले जात आहे.

स्टॅलिन यांनी स्पष्ट संकेत दिले की, संविधानिक संकट निर्माण होऊ नये, असे डीएमकेला वाटते. त्यामुळे पुढील सहा महिने डीएमके कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. पुढील सहा महिने संविधानिक संकटामुळे निवडणूक होऊ नये असे त्यांना वाटते.

डीएमके सरकारने ज्या लोककल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. त्या योजना नवीन सरकार पुढे देखील सुरू ठेवेल, अशा अपेक्षा देखील स्टॅलिन यांनी व्यक्त केल्या आहेत.

एडीएमके-डीएमके युती नाहीच

स्टॅलिन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विजय याला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा आहे. डीएमके ही एडीएमकेसोबत कुठलीही युती करणार नाही. त्यामुळे विजयच्या टीव्हीकेचे सरकार स्थापन होणार असे दिसते आहे.

राज्यपालांची भूमिका संशयास्पद

तामिळनाडूच्या राज्यापालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करायला हवे होते. मात्र, सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला 118 सदस्यांचा पाठींबा असल्याचे पत्र देण्यास राज्यपालांनी सांगितले. हे संविधानाला धरून नसल्याची टीका राज्यपालांवर करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT