Rahul Gandhi, MK Stalin Sarkarnama
देश

MK Stalin news : राहुल गांधी, ममतादीदी घरातून बाहेर पडताच स्टॅलिन यांची मोठी घोषणा; म्हणाले, दुसरा पर्याय नाही!

India Alliance, Rahul Gandhi, Mamata Banerjee, Sonia Gandhi, Mallikarjun Kharge : सध्याच्या परिस्थितीत विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे स्टॅलिन म्हणाले आहेत.

Rajanand More

Delimitation Bill update : परिसीमन विधेयकाला डीएमकेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर रविवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पक्षप्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत नेत्यांनी स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न केले. या भेटीनंतर आघाडीचे नेते मुंबईकडे रवाना झाले. तर या नेत्यांची पाठ फिरताच स्टॅलिन यांनीही मोठी घोषणा केली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांनी स्टॅलिन यांची चेन्नईत जाऊन भेट घेतली. स्टॅलिन यांनी विधेयकला पाठिंबा जाहीर केल्याने सरकारचा मार्ग सुकर झाला आहे. हे टाळण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. पण भेटीनंतरही स्टॅलिन यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. त्यांनी विधेयकाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीनंतर मीडियाशी बोलताना स्टॅलिन म्हणाले, 1971 च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन झाल्यास तामिळनाडूला त्याचा मोठा फटका बसेल. दक्षिण भारतातील सर्वच राज्यांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. दक्षिणेकडील राजकीय पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

सध्याच्या परिस्थितीत विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे सांगत स्टॅलिन म्हणाले, दुसरा कोणताही पर्यायी प्रस्ताव काँग्रेसने दिलेला नाही. संसदेत आमच्याकडे असलेल्या संख्याबळाचा वापर करून आम्ही पुढील 25 वर्षांसाठी तामिळनाडूचे राजकीय भविष्य सुरक्षित केले आहे.

भावनिक होऊन किंवा घाईघाईने विधेयकावर निर्णय घेण्यास अजिबात वाव नाही. अण्णा (सी. एन. अण्णादुराई) यांच्यापासून ते स्टॅलिनपर्यंत आम्ही राज्यांच्या अधिकारांसाठी लढा देत आलो आहोत आणि या संघर्षात आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा विश्वासही स्टॅलिन यांनी व्यक्त केला. देशभरातील नेते येथे आले असले, तरी आमची भूमिका पूर्वीही तीच होती, आजही तीच आहे आणि भविष्यातही तीच राहील, ती म्हणजे तामिळनाडू प्रथम, स्टॅलिन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT