MK Stalin  Sarkarnama
देश

MK Stalin : राहुल गांधी प्रवासात असतानाच एम स्टॅलिन यांचे उत्तर, 'आमची नोंद इतिहास स्वाभिमानी म्हणून करेल'

MK Stalin Rahul Gandhi : स्टॅलिन म्हणाले की,'आम्ही या मार्गावरून कधीही तडजोड करणार नाही आणि मला खात्री आहे की इतिहास आमची नोंद विश्वासघातकी म्हणून करणार नाही.

Roshan More

MK Stalin News : डिलिमीटेशन बीलाला एम के स्टॅलिन यांच्या डीएमकेने पाठींबा दिला आहे. स्टॅलिन यांचे मन वळविण्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते विशेष विमानाने चेन्नईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण चेन्नईला जात स्टॅलिन यांना भेटणार असल्याचे सांगितले.

राहुल यांच्या ट्विटनंतर स्टॅलिन यांनी देखील त्याला उत्तर दिले आहे. स्टॅलिन यांनी म्हटले की, 'संविधानाचे रक्षण करण्यामध्ये आणि राज्यांचे अधिकार जपण्यामध्ये द्रमुकची ऐतिहासिक भूमिका मान्य केल्याबद्दल, बंधू राहुल गांधी यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही नेहमीच तामिळनाडू आणि आमच्या तामिळ जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक निर्णय घेतला आहे.'

पुढे ते म्हणाले की,'आम्ही या मार्गावरून कधीही तडजोड करणार नाही आणि मला खात्री आहे की, इतिहास आमची नोंद 'एट्टाप्पन' (विश्वासघातकी) म्हणून नव्हे, तर 'कट्टाबोम्मन' (स्वाभिमानी रक्षक) म्हणून करेल.'

राहुल गांधी काय म्हणाले?

'इंडिया' आघाडीचे वरिष्ठ नेते आणि मी चेन्नईला जात आहोत. तिथे आम्ही थिरु एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांना आणि द्रमुकला विनंती करणार आहोत की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करावा. लोकसभेतील जागांची संख्या वाढवून ८५० करणे म्हणजे भारतातील लोकशाहीचा अंत ठरेल. यामुळे भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा त्यांच्या फायद्यानुसार पुन्हा आखण्यासाठी अमर्याद संधी मिळेल.

बंधू स्टॅलिन हे नेहमीच तामिळविरोधी शक्तींविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रीय हितासाठी, तामिळनाडूच्या हितासाठी आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी, आपल्याला मिळून या विधेयकाचा पराभव करायचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT