Congress News : ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! सभापती पाठोपाठ उपसभापती निवडीत काँग्रेसचा मोठा विजय; जिंकल्या 257 जागा

Rajasthan Panchayat Samiti Deputy Chairman Election : राजस्थान पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत मोठे यश मिळवले आहे. 418 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 257 जागा मिळवल्या आहेत.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajasthan Election News : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. पंचायत समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. राज्यातील 419 पंचायत समित्यांपैकी 418 ठिकाणांचे निकाल समोर आले असून काँग्रेसने 257 जागांवर विजय मिळवल्याची आकडेवारी समोर आली आहे. दुसरीकडे भाजपला 91 जागांवरच यश मिळालं.

राजस्थानमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर राजकीय पक्षांमध्ये सत्तास्थापनेसाठी चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला मागे टाकत अनेक ठिकाणी आपली ताकद दाखवून दिली. उपसभापती निवडणुकीतील निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

पंचायत समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने 257 जागा जिंकल्या, तर भाजपला 91 जागांवर विजय मिळवता आला. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (RLP) 34 जागा मिळवल्या. भारत आदिवासी पक्षाने (BAP) 10 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (CPI-M) तीन जागांवर यश मिळवलं. याशिवाय 23 पंचायत समित्यांमध्ये अपक्ष उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आले आहेत.

BJP vs Congress (AI Image)
Rajasthan ZP Election Result : भाजपचा दारुण पराभव, काँग्रेसची 24 जिल्हा परिषदांवर सत्ता, पंचायत समितीमध्येही दणदणीत विजय

याआधी झालेल्या पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. राजस्थानमधील 37 जिल्हा परिषदांपैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपला पाच जिल्हा परिषदांमध्ये यश मिळालं. पंचायत समिती सभापती पदांच्या निवडीतही काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले होते. उपसभापती निवडणुकीत जिल्हानिहाय निकाल पाहता काही ठिकाणी भाजपने आपली पकड कायम ठेवली, तर काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली.

उदयपूरमध्ये भाजपचं वर्चस्व

उदयपूर जिल्ह्यातील 19 पंचायत समित्यांपैकी भाजपने 13 ठिकाणी उपसभापती पद मिळवलं. त्यातील दोन ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले. काँग्रेसला पाच पंचायत समित्यांमध्ये विजय मिळाला, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.

टोंक जिल्ह्यात काँग्रेसची दमदार कामगिरी

टोंक जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी सात ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आले. भाजपला टोडारायसिंग पंचायत समितीत एका जागेवर विजय मिळवता आला. जैसलमेर, राजसमंद आणि सवाई माधोपूर जिल्ह्यांमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे पाली आणि डीग जिल्ह्यांमध्ये भाजपने उपसभापती पदावर यश मिळवलं.

BJP vs Congress (AI Image)
Rajasthan Election Results : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपची दाणादाण; 31 पैकी 21 जागांवर काँग्रेसचा विजय, राज्यभर दिग्गजांना हादरे

राजस्थानमध्ये 2028 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल राज्यातील राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः सत्ताधारी भाजपला पंचायत समिती स्तरावर मिळालेल्या मर्यादित यशामुळे आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने या निकालांकडे लक्ष दिलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.