Tamil Nadu politics latest updates 2026: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहेत. पाचपैकी तीन राज्यांत पश्चिम बंगाल,आसाम, पुद्दुचेरी या तीन राज्यांत भाजप,तर केरळमध्ये काँग्रेस आणि तमिळनाडूत टीव्हीके या पक्षांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
तर यात तमिळनाडूच्या राजकारणात सिनेअभिनेता व टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांच्या करिष्म्यामुळे 'विजयी' चमत्कार घडला आहे. यात आता तमिळनाडूतून आणखी एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानानंतर सर्वच एक्झिट पोलमध्ये थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्ष 'किंगमेकर' ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर सोमवारी (ता.4 मे)जाहीर येत असलेल्या तमिळनाडूच्या निकालात 'टीव्हीके'ने करुणानिधी यांच्या द्रमुक,जयललिता यांच्या अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना जोरदार हादरा देत राजकारणच फिरवलं आहे.
याचदरम्यान, तमिळनाडूची सत्ता गमावलेल्या मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचा कोलातून मतदारसंघात धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. टीव्हीके पक्षाच्या एस.बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पराभवाचा धक्का देत एस. बाबू हे एका अर्थानं जायंट किलर ठरले आहेत.
अभिनयाची चंदेरी दुनिया सोडून टॉलिवूड सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजय यांनी'तमिळगा वेट्टी कड़गम' (TVK) पक्षाची स्थापना केली होती. यानंतर पहिल्यांदाच तमिळनाडूच्या राजकारणात एन्ट्री घेतलेल्या विजय यांच्या टीव्हीके पक्षानं 2026 च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित आणि ऐतिहासिक कामगिरी करत सत्तास्थापनेकडे वाटचाल केली आहे.
टीव्हीकेच्या थलपती विजयनं प्रचारादरम्यान,महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवल्याचं दिसून आलं होतं. त्यांनी त्यांच्याप्रचारावेळी दरमहा 2500 रुपयांची मदत, 6 मोफत गॅस सिलेंडर आणि कर्ज माफी यांसारख्या विविध गेमचेंजर घोषणा केल्या होत्या.
तमिळनाडूतील समोर येत असलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आणि विजयी जल्लोषांचं वातावरण दिसून येत आहे. त्यांच्या वडिलांनी, एस.ए. चंद्रशेखर यांनी, विश्वास व्यक्त केला आहे की विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.