Vijay Stalin Assembly Jaw Controversy Sarkarnama
देश

Stalin Vijay Row : मारहाणीत माझ्या जबड्याचे हाड मोडले..! CM विजय यांच्या विधानसभेतील कृतीनं स्टॅलिन दुखावले अन् सगळं सांगितलं...

Vijay Stalin Assembly Controversy : तुरुंगातील मारहाणीने जबड्याचे हाड मोडले, त्या वेदनादायक आठवणींचा उल्लेख करत स्टॅलिन यांनी विधानसभेत जबड्यावर हात ठेवून खिल्ली उडवणाऱ्या CM विजय यांना पदाला साजेसे वागण्याचा सल्ला दिला

Rajanand More

Tamil Nadu Politics : तमिळनाडूतील राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री विजय यांनी माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या जबड्यावरून खिल्ली उडविल्याचा आरोप डीएमकेकडून केला जात आहे. स्टॅलिन यांनीही विजय यांच्यावर प्रहार करत पदाला साजेसे वागण्याचा सल्ला दिला. विधानसभेलाच 'रील्स' बनवण्याचे ठिकाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्टॅलिन यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करत विजय यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी मिसा कायद्याविरोधातील पक्षाची भूमिका आणि त्यावेळी त्यांना झालेल्या अटकेचा आठवण काढली. ते म्हणाले, तत्कालीन केंद्र सरकारने ३१ जानेवारी १९७६ रोजी डीएमकेचे सरकार बरखास्त केल्यानंतर 'मिसा' कायद्यांतर्गत मला अटक करण्यासाठी पोलीस माझ्या घरी आले होते. त्यावेळी मी घरी नव्हतो. दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर पोलिसांनी मला अटक केली.

तुरुंगात कुष्टरोगी

तुरुंगातील वेदनादायी अनुभव सांगताना स्टॅलिन म्हणाले, तुरुंगात खूप अत्याचार झाले. कुष्ठरोगी असलेल्या ठिकाणी आम्हाला डांबले होते. एका लहान खोलीत दहा जण होते. त्याच खोलीत एका भांड्यात आम्हाला लघुशंका करावी लागत होती. अत्यंत दुर्गंधीयुक्त जागेतच आम्हाला झोपावे लागत असे. रात्री पोलीस लाठ्यांनी मारायचे.

जबड्याचे हाड मोडले

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदीही मारहाण करायचे. त्यांच्या मारहाणीतच खासदार चिट्टी बाबू यांचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. कैद्यांच्या मारहाणीमुळे माझ्या जबड्याचे हाड मोडले होते, असे सांगतानाच स्टॅलिन यांनी 'तुम्हीही जबड्याच्या जवळ हात ठेवून ते दाखवलेत ना?', असा प्रश्न विजय यांना उद्देशून केला.

आजही तुरुंगातील मारहाणीच्या खुणा माझ्या अंगावर आहेत, असे स्टॅलिन म्हणाले. विजय यांनी विधानसभेत जबड्याला हात लावत स्टॅलिन यांची खिल्ली उडविल्याचा मुद्दा तापल्यानंतर स्टॅलिन संतापले आहेत.

विधानसभेत अनावश्यक वादांबद्दल न बोलण्याचा सल्ला विजय यांना देत स्टॅलिन म्हणाले, विधानसभेलाच तुम्ही 'रील्स' बनविण्याचे ठिकाण केले आहे. एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगप्रमाणे तुम्ही प्रशासन चालवत आहात. अकार्यक्षम कारभार लपवण्यासाठी विविध 'रील्स' पोस्ट करून लोकांची फसवणूक करत आहात. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, अशी टीकाही स्टॅलिन यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT