MLA Assault Sarkarnama
देश

MLA viral Video : खोक्या, बोक्या सोडा... आमदाराकडूनच स्थानिकाला मारहाण; Video व्हायरल

MLA Shamsul Huda Assault by MLA : एका भूमिपुजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या या आमदारांकडून स्थानिक नागरिकाला मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Rajanand More

Assam Politics : मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात नागरिकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही जणांना अटकही करण्यात आली आहे. स्थानिक गुंडांच्या दहशतीचे हे व्हिडिओ सातत्याने समोर होत आहेत. त्यामध्ये आता एका आमदाराच्या व्हिडिओची भर पडली आहे. मात्र, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून आसाममधील आहे.

एका भूमिपुजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या या आमदारांकडून स्थानिक नागरिकाला मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे. शमसूल हुदा असे या आमदारांचे नाव आहे. एका पुलाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी भूमिपुजनासाठी केळीची पाने आणण्यात आली होती.

एक व्यक्ती हातात भूमिपुजनासाठीचे साहित्य घेऊन उभा होता. या व्यक्तीच्या शेजारी असलेल्या स्थानिकाकडे पाहून आमदारांना राग आला. त्यांनी थेट त्याच्या थोबाडीत मारले. त्यानंतर पूजेसाठी आणलेल्या केळीचे पानाने त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक घडलेला हा प्रकार पाहून इतर उपस्थितांनाही धक्का बसला. मात्र, कुणीही त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओत दिसत नाही.

आमदारांनी मारहाण केलेल्या संबंधित व्यक्तीचे नाव सहिदूर रेहमान असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती स्थानिक कंत्राटदाराकडील कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितले की, मी माझे काम करत असताना त्यांनी अचानक मला मारायला सुरूवात केली. लोकप्रतिनिधीकडून अशी वागणूक अपेक्षिक केली नव्हती. हे खूपच त्रासदायक होते.

दरम्यान, या घटनेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. स्थानिकांकडून आमदारांच्या या वागणुकीचा निषेध केला जात आहे. याबाबत आमदारांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी आमदारकी तातडीने रद्द करण्याची मागणी केली. तर एकाने आमदाला मतदान करणाऱ्या मतदारांवरच आगपाखड केली. नेत्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील, असे एकाने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT