देश

Big Announcement : आमदारांची चांदी! प्रत्येकाला नवी कार अन् 25 लाखांचे आरोग्य कवच; देशात पहिल्यांदाच 'या' राज्यात मोठी घोषणा!

New benefits announced for MLAs : आमदारांसाठी मोठी घोषणा! प्रत्येक आमदाराला नवी कार आणि 25 लाख रुपयांचे आरोग्य कवच देण्याचा निर्णय; कोणत्या राज्याने केली ही घोषणा? जाणून घ्या.

Rashmi Mane

तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी विधानसभा अधिवेशनात आमदारांसाठी मोठ्या घोषणा केल्या. मतदारसंघातील जनसेवा आणि नागरिकांशी संबंधित कामे अधिक प्रभावीपणे करता यावीत, यासाठी राज्यातील सर्व आमदारांना सरकारी वाहन देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. आमदारांना मतदारसंघात प्रवास करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले.

या योजनेनुसार प्रत्येक आमदाराला वाहनाशी संबंधित खर्च आणि चालकाच्या वेतनासाठी दरमहा 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय सहाय्यक ठेवण्यासाठी आमदारांना दरमहा 25 हजार रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघातील कामकाजासाठी आवश्यक लॉजिस्टिक सपोर्ट उपलब्ध होणार आहे.

विधानसभेत घोषणा करताना मुख्यमंत्री विजय म्हणाले, “विधानसभेच्या सर्व सदस्यांना शासकीय वाहने उपलब्ध करून दिली जातील, जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली लोकसेवा पार पाडू शकतील आणि आपल्या मतदारसंघाप्रती असलेली जबाबदारी योग्य रीतीने निभावू शकतील..” विधायक जोथीमनी यांनी आमदारांना आवश्यक संसाधने आणि लॉजिस्टिक सपोर्ट मिळण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही घोषणा केली.

दरम्यान, तमिळनाडू सरकारने आरोग्य क्षेत्रातही मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री व्यापक आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणारे वार्षिक कव्हरेज 5 लाख रुपयांवरून थेट 25 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य विमा योजनेतील लाभार्थ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मेडिकल आणि नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी सरकारकडून 351 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण 6,098 अतिरिक्त जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये BSc नर्सिंगच्या 660, नर्सिंग कॉलेज आणि शाळांमध्ये 1,925, पॅरामेडिकल अभ्यासक्रमांमध्ये 2,778 आणि मेडिकल अभ्यासक्रमांमध्ये 735 अतिरिक्त जागांचा समावेश आहे.

याशिवाय राज्यात 7 नवीन सरकारी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पेरम्बलूर येथे सुमारे 300 कोटी रुपयांच्या खर्चातून 400 खाटांचे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची योजनाही सरकारने मांडली आहे.

चेन्नई, तिरुनेलवेली, थुथुकुडी, चेंगलपट्टू, तिरुवरूर, करूर आणि कन्याकुमारी येथील सरकारी रुग्णालयांमध्ये ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी मेडिकल आणि सर्जिकल सेवांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे आमदारांसाठी सरकारी वाहन आणि आरोग्य विमा कव्हरेज वाढवण्यासोबतच तमिळनाडू सरकारने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT