Ritu Tawde : मुंबईकारांचा पैसा प्रसिद्धीसाठी उडवणार! महापौर रितू तावडेंच्या सोशल मीडियासाठी 25 लाख खर्च करणार? खरं काय ते स्वतःच सांगितलं

Ritu Tawde social media promotion : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च होणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं. नेमकं खरं काय?
BJP Mayor Ritu Tawade
BJP Mayor Ritu TawadeSarkarnama
Published on
Updated on

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मुंबई महापालिका तब्बल 25 लाख रुपये खर्च करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. महापौरांच्या सोशल मिडिया अकाऊंटचे व्यवस्थापन करण्यासाठी वर्षभराच्या कालावधीसाठी 25,12,786 रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईकरांच्या पैशांचा वापर प्रसिद्धीसाठी केला जात असल्याची टीका होऊ लागली.

19 ऑगस्ट 2026 रोजी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी सोशल मीडिया व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी ‘रनटाइम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून महापौरांचे दैनंदिन कार्यक्रम, बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

BJP Mayor Ritu Tawade
AAP Leader Arrest : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का! आपच्या माजी मंत्र्यांसह 6 जणांना अटक, तब्बल 1900 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप!

मात्र, या प्रस्तावावरून महापौर रितू तावडे यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, “माझ्या प्रसिद्धीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून २५ लाख रुपये खर्च केले जाणार असल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “याप्रकरणी मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छिते की, पालिकेची mybmc ही अधिकृत समाज माध्यमे तांत्रिकदृष्ट्या हाताळण्यासाठी २ वर्षांपूर्वी विहित निविदा प्रक्रियेद्वारे मेसर्स रनटाईम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.”

BJP Mayor Ritu Tawade
Exams Cancelled : मोठी बातमी! तब्बल 44 सरकारी भरती परीक्षा रद्द; विद्यार्थ्यी आंदोलनासमोर झुकले सरकार, नेमका निर्णय काय?

महापौरांच्या म्हणण्यानुसार, संबंधित संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 या 1 वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यांच्या कार्यालयाने स्वतंत्रपणे कोणतीही संस्था नियुक्त केलेली नाही किंवा अतिरिक्त खर्च सुचवलेला नाही, हा खर्च संपूर्ण पालिकेच्या एकत्रित तांत्रिक व्यवस्थेचाच भाग असल्याने प्रसारमाध्यमांनी कृपया या वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये. असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com