Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Supreme Court hearing : ...म्हणून आम्ही राज्याबाहेर गेलो; शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले कारण

Shivsena News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court hearing News : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. न्यायालयात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने युक्तीवाद सुरु आहे. शिंदे गटाचे ज्येष्ट वकिल निरज किशन कैल युक्तीवाद करत आहेत.

यावेळी कौल म्हणाले, पक्षातील असंतोष म्हणजे फूट नाही. काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीची (Ncp) विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत (Shivsena) कधीच असंतोष नव्हता. आमचा आघाडीला विरोध होता. आम्ही शिवसेना आहोत. आम्हाला तशी मान्यता मिळाली आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमच्या जीवाला धोका होता, आमची घरे जाळण्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षिततेच्या कारणामुळे आम्ही आम्ही राज्याबाहेर गेलो. अपात्रतेसंदर्भात आम्हाला नोटीस देण्यात आली नाही, असे कौल यांनी सांगितले. यावेळी कौल यांनी मध्यप्रदेशातील शिवराज सिह चौहान प्रकरणाचा दाखला दिला.

दरम्यान, मंगळवारी ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर, व अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युक्तीवाद केला होता. त्यानंतर कौल यांचा युक्तीवाद सुरु आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. या आठवड्यात ठाकरे गट तसेच शिंदे गटाचे वकीलही बाजू मांडणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात निकाल लागू शकतो, असे देसाई यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT