rajnath singh | Chirag Paswan | hd kumaraswamy | jyotiraditya scindia | nitin gadkari | raksha khadse | prataprao jadhav | ramdas athawale  sarkaranama
देश

Oath Ceremony In India : राजनाथ सिंह, चिराग पासवान, कुमारस्वामी, शिंदे अन्..., 'या' नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन; महाराष्ट्रातून कुणाला?

Modi 3.0 Ministers Get Calls Ahead Of Swearing : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी 3.0 सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी खासदारांना फोन येत आहेत.

Akshay Sabale

Modi Cabinet Minister List : नरेंद्र मोदी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना फोना-फोनी सुरू झाली आहे. भाजप नेते नितीन गडकरी, राजनाथ सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, एच. डी कुमारस्वामी, चिराग पासवान, रामनाथ ठाकूर, अनुप्रिया पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेना ( शिंदे गट ) खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) आणि रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसे ( Raksha Khade ), रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आल्याचं समोर येत आहे.

चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचे ( रामविलास पासवान ) बिहारमध्ये पाच उमेदवार निवडून आले आहेत. चिराग पासवान स्वत: हाजीपूर मतदारसंघातू निवडून आले आहेत. नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा नागपूरमधून लोकसभा निवडून जिंकली आहे. गडकरी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. तर, रामनाथ ठाकूर हे नितीनकुमार यांच्या 'जेडीयू' पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

अपना दल ( सोनेलाल ) पक्षाकडून अनुप्रिया पटेल यांनी दोन जागांवर निवडून लढली होती. ज्यात एक जागेवर अनुप्रिया पटेल निवडून आल्या आहेत. जीतन मांझी यांच्या हिंदुस्तानी आवा मोर्चाला ( सेक्युलर ) 'एनडीए'कडून एकच जागा मिळाली होती. तेथून मांझी यांनी स्वत: निवडणूक लढत लोकसभेत निवडून गेले आहेत. तर, जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या. दोन्ही जागांवर त्यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. जयंत चौधरी स्वत: राज्यसभा खासदार आहेत.

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे. तीन वेळ खासदार म्हणून राम मोहन नायडू कॅबिनेट तर चंद्रशेखर मेम्मासानी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT