Mamata Banerjee : मोदींच्या शपथविधीआधी ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, 'इंडिया' आघाडी...

Mamata Banerjee On Narendra Modi : जनतेचं बहुमत बदल करण्यासाठी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी पद सोडून अन्य कुणाला तरी संधी दिली पाहिजे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkaranama

TMC VS BJP : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) 'इंडिया' आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसनं देशात 100 जागांवर विजय मिळवला आहे. तर, 'एनडीए'कडे 294 जागांसह बहुमत असल्यानं नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण, 'एनडीए' सरकार फार काळ टिकणार नाही, असा मोठा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांशी चर्चा केल्यानंतर ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारला. तेव्हा, शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

"आम्हाला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं नाही. देशाला बदलाची गरज आहे. आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आज 'इंडिया' आघाडीनं सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. याचा अर्थ भविष्यात आम्ही तसे करणार नाही," असं मोठं विधान ममता बॅनर्जी यांनी केलं.

ममता बॅनर्जी यांनी 'सीएए'वरून भाजपला लक्ष्य केलं. "सीएए कायदा रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

Mamata Banerjee
Mamata Banerjee : ममतादीदींचे ‘खेला होबे’! शपथ घेण्याआधीच पाच खासदार देणार भाजपला धक्का?

"तुमचा ( भाजप ) पक्ष आम्ही तोडणार नाही. पण, तुमचा पक्ष आतून फुटेल. तुमच्या पक्षात पक्षात लोक खूश नाहीत," अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com