prime minister narendra modi  
देश

Modi Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच ; मंत्रिपदाची माळ यांच्या गळ्यात पडणार

Modi Cabinet Expansion : जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल २० जानेवारी समाप्त होत आहे.

सरकारनामा ब्युरो

Modi Cabinet Expansion : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याचे संकेत आहे. त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. . (Modi Cabinet Expansion news update)

१४ जानेवारी नंतर मंत्रिमंडळ विस्तार, आणि फेरबदल होण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. अर्थंसंकल्पाच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार, आणि फेरबदल होण्याची शक्यता आहे. संघटना पातळीवर मोठे बदल होणार असल्याची माहिती आहे

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल २० जानेवारी समाप्त होत आहे. नव्या अध्यक्षाची निवड आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जानेवारीत आयोजित करण्यात आली आहे.

पुढील वर्षी ९ राज्यात विधानसभा निवडणुक होत आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. गेल्या वर्षी ७ जुलै रोजी मोदी सरकारने दुसऱ्यांदा केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १२ मंत्र्यांना पदावरुन हटविण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर सरकार, पक्ष, संघटना पातळीवर मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना आणि मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील काही खासदारांना गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. तर काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.

भाजपने या वर्षी उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुरमध्ये बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. या चारही राज्यात भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली आहे.

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुंसडी मारत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. तर दिल्ली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT