Winter Session 2022 : 52 हजार कोटींच्या कामांची घोषणा ; विदर्भाला काय दिलं ?

Winter Session 2022 : योजनांची अंमलबजावणी कशी करणार?, हे सरकारने अजून स्पष्ट केले नाही." असे ठाकरे म्हणाले.
Winter Session 2022  news
Winter Session 2022 news Sarkarnama
Published on
Updated on

Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. अधिवेशनात यंदा विक्रमी दोन हजार लक्षवेधी मांडण्यात आल्या. विविध प्रश्नांवर चर्चा झाली, लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले, पण ज्या नागपुरात गेल्या आठ दिवसापासून हे अधिवेशन होत आहे, त्या नागपुरला काय दिले असा, प्रश्न सध्या विचारला जातो.

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत यावर टीका केली. शिंदे-फडणवीस सरकार, दिशा सॅलियन, हिवाळी अधिवेशनातील विषय यावर टीका ठाकरेंनी टीका केली.

"ज्या विदर्भासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन भरवले जाते, त्या विदर्भाला या हिवाळी अधिवेशनाने काहीच दिले नाही. अधिवेशनात अतिवृष्टी, शेतकऱ्यांना नुकसना भरपाई या मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चाच झाली नाही,अधिवेशनात राज्य सरकारने 52 हजार कोटींच्या कामांची घोषणा केली आहे. मात्र, त्याची तरतूद कशी करणार?, योजनांची अंमलबजावणी कशी करणार?, हे सरकारने अजून स्पष्ट केले नाही." असे ठाकरे म्हणाले.

शेवटच्या दिवशी सरकारकडून विदर्भासाठी काही वेगळी घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज भरगच्च कामकाज आहे. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज सरकारकडून उत्तर दिलं जाईल.

Winter Session 2022  news
RSS कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी लिंब टाकलीत का तपासा ? ; असं ठाकरे भागवतांना का म्हणाले..

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची अद्याप हकालपट्टी का झाली नाही,? असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. "राज्यपाल कोश्यारी व मंत्र्यांनी महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्ये करूनही त्यांच्यावर सरकारने काहीच कारवाई केली. असे निर्लज्ज लोक अजूनही पदावर आहेत. अधिवेशनाला अजून दीड दिवस बाकी आहे. या दीड दिवसांत तरी सरकार यावर काही तरी भूमिका मांडेल," अशी अपेक्षा ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

Winter Session 2022  news
Uddhav Thackeray on Shinde: शिंदे यांच्यात हिंमत नाही, ते फक्त पक्ष, कार्यालय, नेते चोरतात..! ; ठाकरेंचा घणाघात

ठाकरे म्हणाले, ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले. त्यांचे राजीनामे सरकार घेणार आहे का, की आरोप झाल्यानंतर फक्त क्लिनचीट देणार आहेत. काल मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कार्यालयात मिंघे गट (शिंदे गट) गेला होता. ज्यांच्यात काही करण्याची हिमंत नसते, ते दुसऱ्याचे कार्यालये, पक्ष, नेते चोरतात," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात बुधवारी एकच राडा झाला. शिवसेनेच्या दोन्ही गटाने शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. पोलिस आणि मुंबई महापालिकेच कर्मचारी यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील तणाव निवळला. पण शिंदे गटाने या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. मुंबई महापालिकेतील शिंदे-ठाकरे गटाच्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक वेगळीच भीती सतावत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com