Modi Gold Appeal | Gold Import Duty Hike India Sarkarnama
देश

Gold import duty : PM मोदींच्या आवाहनानंतर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना झटका, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Import Duty Hike India : सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आयात शुल्क वाढवल्यामुळे परदेशातून मागवल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमंतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ज्यामुळे देशात सोने चांदीची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

Jagdish Patil

Gold Import Duty Hike India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशभरातील नागरिकांना पुढील वर्षभरासाठी सोनं खरेदी करू नये, असं आवाहन केलं होतं. सोने खरेदीमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा वापर होत असल्यामुळे त्यांनी हे आवाहन केलं होतं.

मोदींच्या आवाहनानंतर बुधवारी (ता.१३) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोने-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्के होते ते वाढवून आता १५ टक्के केले जाणार आहे. या वाढीव किमती आजपासूनच लागू होणार आहेत.

सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आयात शुल्क वाढवल्यामुळे परदेशातून मागवल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमंतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ज्यामुळे देशात सोने चांदीची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.

साहजिकच यामुळे भारताची व्यापार तूट कमी होण्यास मदत होऊन रुपयाला आधार मिळू शकते. त्यामुळेच आता केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या आवाहनानंतर थेट आयत शुल्क वाढवण्याचा निर्णय घेत बाहेरून मागवल्या जाणाऱ्या सोने चांदीच्या किमती वाढवून त्याची खरेदी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

नरेंद्र मोदींनी नेमकं आवाहनं केलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचं तसंच पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं. यासह त्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य आणि परदेश प्रवास टाळण्याचं आवाहन करत स्वदेशी उत्पादने वापरण्यावर भर देण्याचं आवाहन केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT