MLA expelled : आमदाराने विधानसभेतच मारली पलटी; बाहेर येताच पक्षातून बडतर्फ, मुख्यमंत्र्यांना जाहीर पाठिंबा देणं भोवलं...

TTV Dhinakaran news, Kamaraj expelled : विजय यांना बुधवारी बहुमत सिध्द करावे लागणार आहे. सुरूवातीला बहुमतासाठी झगडणाऱ्या विजय यांना आता जवळपास १५० आमदारांचा पाठिंबा आहे.
Tamil Nadu Assembly
Tamil Nadu AssemblySarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu politics : तामिळनाडू विधानसभा निकालानंतर राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री विजय यांना विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी काही तासच उरले आहेत. सुरूवातीला पाठिंबा मिळविण्यासाठी धावपळ कराव्या लागलेल्या विजय यांना बहुमत सिध्द करण्याच्या तोंडावर आमदारांची स्पर्धा सुरू झाली आहे. एआयएडीएमकेच्या एका गटाने पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षातील आणखी एका आमदाराने विधानसभेत पाठिंबा जाहीर करत खळबळ उडवून दिली.

अम्मा मक्कल मुनेत्र कडघम (AMMK) पक्षाचे एकमेव आमदार एस. कामराज यांनी मंगळवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनातच विजय यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पक्षाचे महासचिव टी. टी. व्ही. दिनाकरन यांनी त्यांना पक्षातून तडकाफडकी बडतर्फ केले. विशेष म्हणजे त्यांच्या पाठिंब्यावरून शपथविधीपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. विजय यांच्या पक्षाने कामराज यांच्या पाठिंब्याचे बनावट पत्र दिल्याचा आरोप दिनाकरन यांनी केला होता.

दिनाकरन यांनी विजय यांच्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार केली होती. कामराज यांनी पत्रकार परिषदेत आपण पक्षासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मंगळवारी विधानसभेत त्यांनी विजय यांना पाठिंबा देत सर्वांनाच धक्का दिला. विजय यांनीही मग काही वेळातच आपल्या भाषणात त्यांचे आभार मानले. कामराज यांच्या पाठिंब्यामुळे विजय यांची विधानसभेतील ताकद आणखी वाढली आहे.

Tamil Nadu Assembly
CM Vijay news : विजय यांनी घेतला तमिळनाडूसह संपूर्ण देशातील जनतेच्या मनातला निर्णय; भाजप, काँग्रेसलाही 'ते' जमलं नाही...

कामराज हे पक्षाचे एकमेव आमदार होते. त्यांच्या बडतर्फीवर बोलताना दिनाकरन म्हणाले, कामराज यांनी विजय यांना पाठिंबा जाहीर करत पक्षाच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात आले. कामराज यांच्यासाठी दिनाकरन थेट राज्यपालांपर्यंत पोहोचले होते. विजय यांनी बनावट पत्र दिल्याची तक्रार त्यांनी राज्यपालांकडेही केली होती. आता कामराज यांच्या भूमिकेमुळे दिनाकरनच तोंडावर आपटले आहेत.

Tamil Nadu Assembly
Congress vs BJP news : 'इंधन' काँग्रेसचे अन् 'पॉवर हाऊस' भाजपचे; अशी निवडणूक देशानं पहिल्यांदाच पाहिली...

दरम्यान, विजय यांना बुधवारी बहुमत सिध्द करावे लागणार आहे. सुरूवातीला बहुमतासाठी झगडणाऱ्या विजय यांना आता जवळपास १५० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते सहजपणे बहुमत सिध्द करतील. एआयएडीएमकेच्या जवळपास ३० आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे पक्षाने विजय यांच्याबाजूने मतदान केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बहुमत चाचणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com