Narendra modi amit shah
Narendra modi amit shah sarkarnama
देश

Modi Cabinet Portfolio Announcements : मोदींची 'नो रिस्क',खाती फिक्स; अमित शाह,राजनाथ सिंह,गडकरी,चौहान सांभाळणार 'ही' महत्त्वाची खातं

Sachin Waghmare

Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर केद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना रस्ते विकास आणि परिवहन खाते देण्यात आले आहे. अमित शाह यांना गृहमंत्रीपद तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्री तर एस जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी एनडीए सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 3.0 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने (Bjp) गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवले आहेत. इतर खाते मित्रपक्षांना दिले आहेत.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुढीलप्रमाणे :

राजनाथ सिंह : संरक्षण

अमित शाह : गृह

अश्विनी वैष्णव : रेल्वे

एस. जयशंकर : परराष्ट्र

निर्मला सीतारमण : अर्थ

नितीन गडकरी : परिवहन, रस्ते विकास

मनोहरलाल खट्टर : ऊर्जा आणि शहर विकास

सीआर पाटील : जलशक्ती

जे. पी. नड्डा : आरोग्य

चिराग पासवान : क्रीडा

शिवराज सिंह चौहान : कृषी आणि किसान कल्याण, पंचायत तथा ग्रामविकास

जीतन राम मांझी : लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग

अन्नपूर्णा देवी : महिला आणि बाल विकास

राम मोहन नायडू : नागरी उड्डाण

सर्वानंद सोनोवाल : पोर्ट शिपिंग

किरेन रिजिजू : संसदीय कार्य

मनसुख मांडविया : कामगार

पीयूष गोयल : वाणिज्य

धर्मेंद्र प्रधान : शिक्षण

एचडी कुमार स्वामी : अवजड उद्योग

ज्योतिरादित्य सिंधिया : टेलिकॉम

भूपेंद्र यादव : पर्यावरण

प्रल्हाद जोशी : ग्राहक संरक्षण

गजेंद्र शेखावत : कला, पर्यटन, सांस्कृतिक

शांतनू ठाकूर : पोर्ट शिपिंग राज्यमंत्री

अजय टमटा :परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा : परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री

श्रीपाद नाईक : ऊर्जा राज्यमंत्री

सुरेश गोपी : कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री

शोभा करंदलाजे : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री

रवनीत बिट्टू : अल्पसंख्याक राज्यमंत्री

SCROLL FOR NEXT