Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एकच जागा मिळाली, याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली आहे, ती त्यांची एकट्याची जबाबदारी नसून आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. हा पराभव एकट्या अजितदादांचा नसून राष्ट्रवादीच्या सर्वांचाच पराभव आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुनील तटकरे यांनी स्पष्ट करीत अजितदादांची बाजू सावरली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचा पहिलाच वर्धापन दिन सोहळा मुंबईमध्ये पार पडला. या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर सडकून टीका केली. (Sunil Tatkare News )
पीएम नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील मोठे नेते आले होते. त्यावेळी अजित पवार हे पहिल्या रांगेतच बसले होते. सुरुवातीला ते दुसऱ्या रांगेत बसले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पुढे बोलावून घेतले. त्यामुळे आम्ही दिल्लीत कोणतीच लाचारी पत्करली नाही व पत्करण्याचा प्रश्न येत नसल्याचे यावेळी तटकरे यांनी सापसाठ केले.
यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक समजल्या जाणाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया व प्रचारसभेतून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करण्यात आली. टीका टिपण्णी करण्यात यावी, मात्र ती धोरणावर करावी, येत्या काळात विरोधकांनी टीका करताना सांभाळून करावी, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळाले नाही. शपथविधीत अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे राज्यातील अस्तित्व संपले आहे, अशी टीका शरद पवार गटाकडून केली जात आहे. यावर बोलताना तटकरे (Sunil Tatkre) यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. त्यामुळे आम्ही राज्यमंत्रीपद स्वीकारले नाही. मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार असल्याने मंत्रिपदाची चिंता कोणी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.