Amit Shah speaks to the media, urging against making a fuss over Jagdeep Dhankhar’s resignation, citing health reasons behind the decision.  Sarkarnama
देश

Amit Shah News : जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाह पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, जास्त ओढूनताणून काही…

Amit Shah Addresses Opposition Speculation : धनखड यांनी 21 जुलैला सायंकाळी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या होत्या.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला असून अमित शाह यांनी त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  2. शाह यांनी स्पष्ट केले की, राजीनाम्याच्या मागे कोणताही राजकीय दबाव नसून तो केवळ व्यक्तिगत आरोग्यामुळेच आहे.

  3. विरोधकांचा आरोप आहे की महाभियोग प्रस्तावावरून सरकारशी मतभेद झाल्याने धनखड यांच्यावर दबाव आणला गेला.

Reason Behind Jagdeep Dhankhar’s Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वादळ उठले होते. मोदी सरकारच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. राजीनामा दिल्यापासून ते एकदाही सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेले नाहीत. त्यावरूनही विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

अमित शाह यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या राजीनामा पत्रामध्ये आपल्या आरोग्याचे कारण दिले होते. अमित शाह यांनीही धनकड यांनी आरोग्याच्या कारणास्तवच राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले.

शाह म्हणाले, जगदीप धनखड हे एका घटनात्मक पदावर होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी घटनेला अनुरूप चांगले काम केले. त्यांनी व्यक्तिगत आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिला आहे. त्यावर कुणीही जास्त ओढूनताणून काही शोधण्याचा प्रयत्न करू नये, असेही शाह यांनी म्हटले आहे. या मुद्द्यावर शहांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, धनखड यांनी 21 जुलैला सायंकाळी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या होत्या. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाच्या प्रस्तावावरून धनखड आणि मोदी सरकार आमनेसामने उभे ठाकल्याची चर्चा होती.

धनखड हे राज्यसभेत विरोधकांनी दिलेला महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यावर ठाम होते. त्यामुळे त्यांना सरकारकडूनच राजीनामा देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी त्यांनी थेट राष्ट्रपती भवन गाठत राजीनामा दिला होता. त्यानंतर सरकारकडून त्यांना निरोपही देण्यात आला नाही. त्यावरूनच विरोधकांकडून सरकारला घेरण्यात आले होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला?
A: त्यांनी आपल्या आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला.

Q2: अमित शाह यांनी राजीनाम्यावर काय म्हटले?
A: शाह यांनी सांगितले की, आरोग्याचाच एकमेव कारण असून यात जास्त ओढूनताणून काही शोधू नये.

Q3: विरोधकांचा आरोप काय आहे?
A: महाभियोग प्रस्तावावर मतभेद झाल्याने सरकारने दबाव टाकून राजीनामा द्यायला लावला, असा आरोप विरोधकांचा आहे.

Q4: राजीनामा कधी दिला गेला?
A: धनखड यांनी 21 जुलै रोजी सायंकाळी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT