
थोडक्यात महत्वाचे :
अमित शहांनी सादर केलेल्या विधेयकानुसार, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास त्यांचे पद आपोआप जाणार आहे.
2014 नंतर आतापर्यंत 12 मंत्र्यांना अटक झाली असून त्यापैकी बहुतेक विरोधी पक्षांचे आहेत; भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांना अटक झालेली नाही.
सर्वाधिक पाच मंत्री तृणमूल काँग्रेसचे तुरुंगात गेले तर आम आदमी पक्षाचे चार, डीएमके व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक मंत्री अटक झाले.
Corruption and Governance Issues in Indian Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हटविण्याची तरतुद असलेले विधेयक सादर केले. या विधेयकावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना, सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आता भाजपची सत्ता देशात आल्यापासून नेमके किती मंत्री, मुख्यमंत्री तुरुंगात गेले, सर्वाधिक कोणत्या पक्षाचे, याची चर्चा सुरू झाली आहे.
सलग 30 दिवस तुरुंगात घालवावे लागल्यास संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे पद आपोआप जाणार असल्याची तरतुद विधेयकात आहे. ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती विरोधकांना वाटते. मागील 11 वर्षांतील स्थिती पाहिल्यास विरोधकांना वाटणारी भीती वरवरची नाही.
देशात भाजपची सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 पासून 12 मंत्र्यांना अटक झाली होती. ईडी किंवा सीबीआयनेच ही अटक केली होती. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री विरोधी पक्षातील होते. भाजप किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील एकाही मंत्र्याला अद्याप अटक झालेली नाही. अटक केलेल्यांमध्ये एका मुख्यमंत्र्यांचा म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा समावेश होता.
केजरीवालांसह आठ मंत्री 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात होते. म्हणजे त्याआधीपासून कायदा अस्तित्वात असता तर त्यांची पदे गेली असती. केजरीवालांसह सात मंत्र्यांवर मनी लाँर्डिंगअंतर्गत गुन्हे होते. या गुन्ह्यांमध्ये सहजासहजी जामीन मिळत नाही. गुन्हे दाखल झालेल्या 12 मंत्र्यांपैकी सर्वाधिक पाच मंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे होते.
तृणमूलपाठोपाठ आम आदमी पक्षाचे चार, अण्णाद्रमुख डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका मंत्र्यांचा समावेश होता. सप्टेंबर 2014 मध्ये तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांना २१ दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. दोन दशकांपूर्वी दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती. त्याआधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
अरविंद केजरीवाल हे जवळपास सहा महिने तुरुंगात होते. मात्र, त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता. ते तुरुंगातूनच सरकार चालवत होते. जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा देत आतिशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली होती. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मागील वर्षीच अटक झाली होती. मात्र, त्याआधी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. दोघांनाही ईडीने अटक केली होती.
जयललिता (एआयडीएमके) – 21 दिवस
सुब्रता मुखर्जी (टीएमसी) – 11 दिवस
फरहाद हकीम (टीएमसी) – 11 दिवस
ज्योती प्रिया मलिक (टीएमसी) – 80 दिवस
मनीष सिसोदिया (आप) – 1 वर्ष 5 महिने
अरविंद केजरीवाल (आप) – 6 महिने
पार्थ चटर्जी (टीएमसी) – 3 वर्षे 27 दिवस
सत्येंद्र जैन (आप) – 2 वर्षे 4 महिने
मदन मित्रा (टीएमसी) – 1 वर्षे 9 महिने
व्ही. सेन्थिल बालाजी (डीएमके) – 1 वर्षे 3 महिने
जितेंद्र तोमर (आप) – 45 दिवस
नवाब मलिक (एनसीपी) – 1 वर्षे 5 महिने
Q1: विधेयकातील महत्त्वाची तरतूद कोणती आहे?
A: सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे पद आपोआप जाणार आहे.
Q2: 2014 नंतर किती मंत्र्यांना अटक झाली?
A: भाजपच्या सत्ताकाळात आतापर्यंत 12 मंत्र्यांना अटक झाली आहे.
Q3: सर्वाधिक कोणत्या पक्षाचे मंत्री तुरुंगात गेले?
A: तृणमूल काँग्रेसचे पाच मंत्री तुरुंगात गेले आहेत.
Q4: पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तुरुंगातून पदावर राहिले होते का?
A: होय, अरविंद केजरीवाल तुरुंगात असतानाही मुख्यमंत्रीपदावर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.