President Of India Controversy | Jairam ramesh  Sarkarnama
देश

India Name Controversy: मोदी सरकारने 'इंडिया'चे नाव बदलले..; काँग्रेस नेत्याने थेट कागदच दाखवला

BJP- Congress Politics : केंद्र सरकारने भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची बातमी समोर आली.

अनुराधा धावडे

New Delhi Political News केंद्र सरकारने भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची बातमी समोर आली. याला काही तास उलटत नाहीत तर जी 20 शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात होणाऱ्या रात्रीच्या जेवणाच्या (डिनर) निमंत्रण पत्रावरून नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरच्या निमंत्रण पत्रात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या शब्दाऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा शब्दप्रयोग केल्याने कांग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

जयराम रमेश म्हणाले, राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरसाठी नेहमीच्या 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या शब्दाऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' यांच्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये 'भारत, म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल' असे लिहिले आहे. पण आता या माध्यमातून 'संघराज्यांवरही'ही हल्ला होत आहे.

INDIA हा शब्द चर्चेत का?

विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या आघाडीचे 'इंडिया' ('I.N.D.I.A') असे नामकरण केलं आहे. तेव्हापासून 'इंडिया' हा शब्द चर्चेत आहे. या आघाडीच्या नावावरून भाजप नेते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

आपण 'इंडिया' शब्दाऐवजी 'भारत' हा शब्द वापरावा.इंग्रजांनी भारत हा शब्द शिवी म्हणून वापरला, पण 'भारत' हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.राज्यघटनेत बदल करून त्यात 'भारत' हा शब्द वापरला जावा, अशी माझी इच्छा आहे. अशी भूमिका भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनीही मांडली आहे.

मोदी सरकार भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकणार ?

दुसरीकडे, केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या काळात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या काळात सरकार संसदेत अनेक विशेष विधेयके मांडू शकते.भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकणे देखील मोदी सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT