Sharad Pawar On Farmers : 'शासन आपल्या दारी' केवळ प्रसिद्धीसाठी; शेतकऱ्यांचे प्रश्न.. ; पवारांनी टोचले कान !

Sharad Pawar On Shinde Fadnavis Pawar Government : "पावसाने दडी मारली, त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे."
Sharad Pawar On farmers
Sharad Pawar On farmers Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जळगाव दौऱ्यावर असून आज दुपारी ते शहरात सभा घेणार आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाष्य करत, राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शेतीच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar On farmers
Sharad Pawar Maharashtra Tour : शरद पवार अखेर मैदानात उतरलेच; जळगाव, आंबेगाव अन्‌ कोल्हापुरात होणार स्वाभिमान सभा

शरद पवार म्हणाले, "शासन आपल्या दारी असे कार्यक्रम केवळ प्रसिद्धीसाठी न राहता, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणवण्यासाठी सरकारने काम करावे. राज्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. शेतीमालाला विशेषत: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक बाजारपेठ उपलब्ध होत नाही. पावसाने दडी मारली, त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे."

Sharad Pawar On farmers
BJP Former MP-MLA Will Join NCP: एकनाथ खडसे देणार भाजपला दणका; माजी खासदार, माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊसच नसल्याने चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. याबाबींचा आढावा घेऊन, गावागावातील लोकांशी संपर्क साधावा, या हेतूने दौरे आखत आहे. यापूर्वी मराठवाड्यात बीड, त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी सभा घेतल्या. लोकांच्या भेटीही घेतल्या. आज उत्तर महाराष्ट्रातील आढावा घेण्यासाठी इथे आलो आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com