नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session 2021)आजपासून सुरवात झाली. या अधिवेशनात कृषी कायदे मागे घेण्याबाबतचे विधेयक (repeal of farm law)मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर गदारोळ झाला. या गदारोळात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी कायदा निरसन विधेयक मांडले होते. या गदारोळात लोकसभेत कृषी कायदा रद्द करण्याचे विधेयक कुठलीही चर्चा न करता मंजूर करण्यात आले.
यावेळी विरोधकांनी गदारोळ केला, कॉग्रेसचे नेते अधीर रंजन चैाधरी यांनी या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली होती. यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यासाठी लोकसभेने कृषी कायदे निरसन विधेयक, 2021 चर्चेविना मंजूर केले आहे.
विरोधी पक्षांना संसदेत शांतपणे प्रश्न विचारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (modi government) यांनी केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, योग्य चर्चा करून देशहितासाठी पुढे जाण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे आणि विधायक चर्चा झाली पाहिजे.
''सरकार आणि त्यांच्या धोरणांविरुद्धचा आवाज संसदेत बुलंद व्हायला हवा, पण संसद आणि अध्यक्षांची प्रतिष्ठाही राखली पाहिजे. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहे. राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर समजूतदारपणाने आणि ऐक्याने बोलले पाहिजे. योग्य चर्चा करून देशहितासाठी पुढे जाण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे,'' असे मोदी यांनी सांगितलं
देशाची माफी मागत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसापूर्वी त्यांनी केलेले तीन कृषी कायदे (Agriculture act) मागे घेण्याचा निर्णय घेतला. ''सामान्य शेतकऱ्यांना आम्ही हे कायदे समजून सांगण्यात कमी पडलो,'' असे म्हणत मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर झुकले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.
''या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल., या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू,'' असे मोदी यांनी सांगितलं होतं. ''शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत, अनेक सुविधा दिल्या. कृषी बजेट पहिल्यापेक्षा पाच पट वाढवलं आहे. चार वर्षात १ लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली,''असे मोदींनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.