Narendra modi amit shah sarkarnama
देश

Amit Shah News : बांगलादेशामधील हिंदूच्या संरक्षणासाठी मोदी सरकार सरसावले; गृहमंत्री अमित शहांचा मोठा निर्णय

Political News : भारत-बांगलादेश सीमेवरील (आयबीबी) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमधील अधिकारी हे बांगलादेशातील समकक्ष अधिकारी यांच्याशी संपर्क साधतील.

Sachin Waghmare

New Dehlli News : बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारत-बांगलादेश सीमेवरील (आयबीबी) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

या समितीमधील अधिकारी हे बांगलादेशातील समकक्ष अधिकारी यांच्याशी संपर्क साधतील. त्यांच्यातील चर्चेनंतर भारतीय नागरिक, हिंदू नागरिक, अल्पसंख्यक नागरिक यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केले. (Amit Shah News)

बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारत-बांगलादेश सीमेवरील (आयबीबी) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बांगलादेशातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम करणार आहे. त्या माध्यमातून जेणेकरून भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शहाने ट्विट करून दिली आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाहने स्पष्ट केले की, केंद्र सरकार सर्व प्रयत्न करून बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करणार आहे. या समितीकडे प्रामुख्याने भारत-बांगलादेशातील सीमेवरीलसंरक्षणाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारची भूमिका नुकत्याच झालेल्या बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकारानंतर घेण्यात आली आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आल्या आहेत. त्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंदूंचे घरे, दुकाने व मंदिरावर हल्ले केले जात आहेत. त्यासोबतच अवामी लीगशी संबंधित हिंदू नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT