Amit Shah and PM Modi  Sarkarnama
देश

Tehreek-e-Hurriyat: मोदी सरकारची मोठी कारवाई; 'या' संघटनेवर घातली बंदी

Ganesh Thombare

Delhi News: जम्मू-काश्मीरमधील 'तहरीक-ए-हुरियत' या संघटनेवर मोदी सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 'तहरिक-ए-हुर्रियत' या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे, यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

'तहरीक-ए-हुरियत' या संघटनेवर फुटीरतावादी विचार पेरण्याचा, तसेच फुटीरतावादाला ही संघटना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच 'तहरीक-ए-हुरियत'या संघटनेवर मोदी सरकारने 'यूएपीए'(UAPA) अंतर्गत कारवाई केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सय्यद अली शाह गिलानी यांनी 7 ऑगस्ट 2004 ला 'तहरीक-ए-हुर्रियत' या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेवर देशविरोधी कारवायात सहभाग घेणे, तसेच फुटीरतावादी शक्तींना बळ देणे, दहशतवादाला खतपाणी घालणे, असे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तर या संघटनेवर आता 'यूएपीए'(UAPA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अमित शाहांनी 'एक्स'अकाऊंटवर काय म्हटलं ?

'तेहरिक-ए-हुर्रियत'ला 'यूएपीए'(UAPA) अंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' घोषित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करून इस्लामिक राजवट स्थापन करण्याच्या कार्यात ही संघटना सहभागी होती, ही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला चालना देण्यासाठी भारतविरोधी प्रचार करत असल्यांचं शाहांनी 'एक्स'अकाऊंटवर म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम गट (एमएलजेके-एमए) या संघटनेवर देखील बंदी घातली होती. या संघटनेवरही देशाच्याविरोधी आणि फुटीरतावादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT