PM Narendra Modi in Parliament News |Parliament Session News | PM Narendra Modi News File Photo
देश

संसदेचं कामकाज सुरू होताच अचानक झाला मोदी-मोदीचा गजर! पंतप्रधान पाहतच राहिले...

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे कामकाज सोमवार (दि. 14) पासून सुरू झाले.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर (Assembly Elections) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे कामकाज सोमवार (दि. 14) पासून सुरू झाले. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ऐतिहासिक विजयासह भाजपनं (BJP) चार राज्यांमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. या विजयामुळे भाजप नेत्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून त्यांचा प्रत्यय सोमवारी लोकसभेतही पाहायला मिळाला. (Parliament Session News)

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आहे. सुरूवातीलाच भाजप व मित्रपक्षांचे मंत्री व खासदारांनी जोरदार बाके वाजवत मोदींचे स्वागत केले. तसेच उभे राहून मोदी...मोदी...चा गजर करत चार राज्यांतील विजयाचे श्रेय मोदींना दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे पंतप्रधानही सदस्यांकडे पाहतच राहिले. अचानक सुरू झालेल्या या गजरामुळे विरोधकही अवाक झाले. (PM Narendra Modi News)

उत्तर प्रदेशात (UP Election 2022) भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नव्हती. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता खेचून आणत विरोधकांना धूळ चारली. गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमध्येही भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. या सर्व राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

चारही राज्यातील नेत्यांनी विजयांचे श्रेय मोदींना दिले आहे. मोदींच्या केंद्रातील नेतृत्वामुळे राज्या-राज्यांतील नागरिकांनी भाजपला मतदान केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. चार राज्यांतील विजयानंतर दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमातही भाजपकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला होता.

काँग्रेसपुढे पेच

दरम्यान, पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये (Congress) अध्यक्षपदावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दर्शवल्याची चर्चा आहे. पण काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध केला आहे. केवळ सोनिया गांधी पराभवाला जबाबदार नाहीत. प्रत्येक राज्यातील प्रमुख नेते, खासदारही तितकेच जबाबदारी आहेत. त्यामुळे सोनिया यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT