...'ती' चूक सोनियांनी स्वीकारली! सिध्दूंसह पत्नी व मुलीवर फोडलं खापर

पंजाबसह इतर चार राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर रविवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली.
Sonia Gandhi
Sonia GandhiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबसह (Punjab) इतर चार राज्यांमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर रविवारी काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली. सुमारे चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकी अध्यक्षपदासह पंजाबमधील पराभवावर मंथन करण्यात आलं. या बैठकीत पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर पराभवाचं खापर फोडण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री बदलण्यात आलेला विलंब त्यास कारणीभूत असल्याचं मत अनेक नेत्यांनी मांडलं. तसेच सिध्दूंवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रामुख्याने जी 23 गटातील नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad), अजय माकन या नेत्यानी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. पंजाब निवडणुकीआधी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना बदलून चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय योग्य असला तरी हा निर्णय घ्यायला विलंब झाला, असं या नेत्यांनी सांगितलं. या निर्णयाची जबाबदारी सोनियांनी बैठकीत स्वीकारल्याचे समजते.

Sonia Gandhi
बीजेडीनं घडवला इतिहास; सर्व 30 जिल्हा परिषदांवर फडकवला झेंडा, 21 महिला अध्यक्षपदी

आझाद म्हणाले, 'कॅप्टन यांच्या नवाबी वागणुकीमुळे केवळ आमदारच नव्हे तर पंजाबमधील पक्षही नाराज होता. दिल्ली असलो तरी याबाबत जाणीव होती.' माकन हे पंजाब उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पराभवाचे खापर सिध्दू कुटुंबावर फोडलं. वीजबिलामध्ये नागरिकांना सवलत देण्याबाबत पक्ष काम करत असताना सिध्दू यांनी सरकारविरोधी वातावरण तयार केलं, असं माकन यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.

Sonia Gandhi
मुकुल वासनिक काँग्रेसच्या अध्यक्षपदी? 23 ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलं होतं नाव

सिध्दू यांची पत्नी व मुलीवरही माकन यांनी ठपका ठेवला. चन्नी यांना पक्षाने मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिध्दू यांच्या पत्नीने केलेली वक्तव्य पक्षविरोधी होती. गरीब मुख्यमंत्री या पक्षाच्या घोषणेविरोधातच त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मुलीने केलेल्या अशाच वक्तव्यामुळेही पक्षाला मोठा फटका बसल्याचा दावा माकन यांनी आपल्या अहवालात केला. हा अहवाल त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केला आहे. त्यामुळे सिध्दूंवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com