Modi Oath Ceremony Sarkarnama
देश

Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी ; वाचा फक्त एकाच क्लिकवर!

Mayur Ratnaparkhe

Prime Minister Swearing : देशात मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळास सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पंतप्रधान पदाची शपथ दिली. तसेच यावेळी ३१ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची, सहा जणांनी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) आणि ३५ जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकूण ७२ जणांचा शपविधा पार पडला. राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या देशाचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले होते.

याशिवाय या शपथविधी सोहळ्यास राजकीय, उद्योग, मनोरंजन, क्रीडा यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज व संत-महंताची हजेरी होती. याशिवाय, एनडीए घटक पक्षाचे नेते आणि मोठ्यासंख्येने निमंत्रितांचीही उपस्थिती होती. याचबरोबर विरोधी पक्ष काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही उपस्थिती होती. मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी खालील प्रमाणे -

महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह रामदास आठवले, प्रतापराव जाधव मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, पीयूष गोयल या सहा जणांचा शपथविधी झाला.

कॅबिनेट मंत्री -

१.नरेंद्र मोदी २.राजनाथसिंह, ३.अमित शाह, ४.नितीन गडकरी, ५.जे.पी.नड्डा, ६.शिवराजसिंह चौहान, ७.निर्मला सीतारामण, ८.एस.जयशंकर, ९.मनोहरलाल खट्टर, १०.एच.डी.कुमारस्वामी, ११.पीयूष गोयल, १२.धर्मेंद्र प्रधान, १३.जीतन राम मांझी, १४.राजीव रंजन सिंग, १५.सर्बानंद सोनवाल, १६.डॉ. वीरेंद्र कुमार, १७.राम मोहन नायडू, १८.प्रल्हाद जोशी, १९.जुएल उराव, २०.गिरीराज सिंह, २१.अश्विनी वैष्णव, २२.ज्योतिरादित्य शिंदे २३. भूपेंद्र यादव २४. गजेंद्र सिंह शेखावत २५. अन्नपूर्णा देवी, २६. किरेन रिजीजू २७. हरदीप सिंग पुरी, २८. मनसुख मांडविय २९. जी. किशन रेड्डी ३०. चिराग पासवान ३१. चंद्रकांत पाटील.

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) -

३२. राव इंद्रजीत सिंह ३३. जितेंद्र सिंह ३४. अर्जुनराम मेघवाल ३५. प्रतापराव जाधव ३६.जयंत चौधरी

केंद्रीय राज्यमंत्री -

३७. जितीन प्रसाद ३८. श्रीपाद नाईक ३९. पंकज चौधरी ४०.किशन पाल ४१. रामदास आठवले ४२.रामनाथ ठाकूर ४३.नित्यानंद राय ४४. अनूप्रिया पटेल ४५.चंद्रशेखर पेम्मासानी ४६. एस.पी सिंह ४७. शोभा करंदलाजे ४८.किर्तीवर्धन सिंह ४९. बीएल वर्मा ५०. शांतनू ठाकूर ५२. सुरेश गोपी ५३. एल. मुरुगन ५४. अजय टम्टा ५५. बंडी संजय ५६. कमलेश पासवान ५७. भागीरथ चौधरी ५७. सतीशचंद्र दुबे ५८.संजय शेठ ५९. रवनीत सिंह बिट्टू ६०. दूर्गादास उइके ६१.रक्षा खडसे ६२. सुकांत मजुमदार ६३.सावित्री ठाकूर ६४. तोखन साहू ६५. राजभूषण चौधरी ६६.भूपती राजू श्रीनिवास ६७.हर्ष मल्होत्रा ६८.निमू बेन बांगडीया ६९. मुरलीधर मोहोळ ७०.जॉर्ज कुरियन ७१.पवित्रा मार्गेरिटा

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT