PM Narendra Modi oath ceremony LIVE : मुरलीधर मोहोळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चे लागले नारे

PM Narendra Modi oath ceremony 2024 LIVE Updates : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी राजधानी दिल्लीत आणि विशेषत: राष्ट्रपती भवनाभोवती विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
PM Narendra Modi oath ceremony 2024 LIVE Updates
PM Narendra Modi oath ceremony 2024 LIVE Updates sarkarnama

Narendra Modi Oath Taking Ceremony LIVE : मोदींशिवाय 71 जणांनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय 71 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

Narendra Modi Oath Ceremony live updates : जॉर्ज कुरियन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

जॉर्ज कुरियन, पवित्रा मार्गेरिटा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Oath-Taking Ceremony live : मुरलीधर मोहोळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी राष्ट्रपती भवन दुमदूमन गेलं.

Narendra Modi Swearing-In Ceremony LIVE : सावित्री ठाकूर, राजभूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी घेतली शपथ

सुकांता मुजुमदार, सावित्री ठाकूर, छत्तीसगडमधील बिलासपूरमधून खासदार असलेले तोखन साहू, राजभूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, पूर्व दिल्लीतून पहिल्यांदाच खासदार बनलेले हर्ष मल्होत्रा, नीमूबेन बमनभानिया यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi speech live today :  रावेरमधून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

रांचीचे खासदार संजय सेठ, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उईके, रावेरमधून निवडून आलेल्या रक्षा खडसे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi speech live : बंडी संजय कुमार अन् कमलेश पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ...

डॉ. एल मुरूगन, उत्तराखंडमधील अलमोरामधून खासदार बनलेले अजय टमटा, तेलंगणाचे खासदार बंडी संजय कुमार, उत्तर प्रदेशातील बांसगावमधून तिसऱ्यांदा खासदार बनलेले कमलेश पासवान, अजमेरचे खासदार भागिरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे यांनी राज्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे.

Modi Oath Ceremony LIVE : केरळमधील भाजपच्या एकमेव खासदारानं घेतली मंत्रिपदाची शपथ

कीर्तिवर्धन सिंह, उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष बी. एल. वर्मा, पश्चिम बंगालच्या बनगावमधून निवडून आलेले शंतनू ठाकूर, केरळमधील एकमेव खासदार सुरेश गोपी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi Swearing-In Ceremony LIVE :  पेम्मासानी, करंजलाजे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

आंध्रप्रदेश गुंटूरमधील खासदार चंद्रशेखर पेम्मासानी, एस. पी. सिंह बघेल, उत्तर बंगळुरूमधून निवडून आलेल्या शोभा करंदलाजे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi oath live : कर्पुरी ठाकूर, अनुप्रिया पटेल अन्....; या खासदारांनी घेतली शपथ 

जेडीयूचे राज्यसभेचे खासदार कर्पुरी ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi Oath Ceremony live updates : रामदास आठवलेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

उत्तर प्रदेशमधील पंकज चौधरी, हरयाणातील कृष्णपाल आणि रामदास आठवले यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Modi Swearing in Ceremony live updates : जयंत चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जितिन प्रसाद यांनी शपथ घेतली आहे. 2021 मध्ये ते काँग्रेस सोडून भाजपत आले होते.

Modi oath-taking ceremony LIVE updates : प्रतापराव जाधव यांनी घेतली शपथ 

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Modi Oath Ceremony LIVE : अर्जुनराम मेघवाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

राजस्थानच्या बिकानेरमधून लोकसभेवर विजयी झालेले अर्जुनराम मेघवाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Oath-Taking Ceremony live : राव इंद्रजित सिंह, जितेंद्र सिंह घेतली शपथ 

राव इंद्रजित सिंह यांनी राज्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. गुरूग्रामधून ते सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. उधमपूरमधून निवडून आलेले जितेंद्र सिंह यांनीही राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Oath Taking Ceremony Live : चिराग पासवान यांनी घेतली शपथ 

लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आणि खासदार जी किशन रेड्डी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Prime Minister Narendra Modi Oath Ceremony LIVE : माजी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी पुन्हा घेतली मंत्रिपदाची शपथ

हरदीप सिंग पुरी आणि मनसुख मांडवीय, जी किशन रेड्डी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Prime Minister Oath Ceremony live : भुपेंद्र यादव अन् तीन मंत्र्यांनी घेतली शपथ

भूपेंद्र यादव आणि गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णादेवी, किरेन रिजिजू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Prime Minister Swearing-in Live : मी ज्योतिरादित्य माधवराव शिंदे शपथ घेतो की...

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

Modi Swearing in Ceremony live updates : गिरिराज सिंह, अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ

जोयल ओरम, गिरिराज सिंह, अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Modi Oath Ceremony LIVE : सर्वानंद सोनावाल यांच्यासह तीन मंत्र्यांनी घेतली शपथ

सर्वानंद सोनावाल, वीरेंद्र कुमार, टीडीपी नेते किंजरापू राम मोहन नायडू आणि प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Prime Minister Oath Ceremony live : नितीशकुमार यांच्या 'या' नेत्यानं घेतली शपथ

जेडीयूचे नेते, राजीव सिंह 'लालन' यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Prime Minister Narendra Modi Oath Ceremony LIVE : जितन रमा मांझी यांनी घेतली शपथ 

हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे ( सेक्यूलर ) संस्थापक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Oath-Taking Ceremony live : धमेंद्र प्रधान यांनी 11व्या क्रमाकांवर घेतली शपथ

माजी पेट्रोलियम मंत्री, धमेंद्र प्रधान यांनी मोदी 3.0 सरकारमध्ये शपथ घेतली आहे.

PM Modi Oath Taking Ceremony Live : पीयूष गोयल यांनी घेतली शपथ 

पहिल्यांदा लोकसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले पीयूष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

PM Modi Oath Ceremony LIVE : एच. डी कुमारस्वामींनी घेतली शपथ

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, एच. डी कुमारस्वामी यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली आहे.

Narendra Modi Swearing-In Ceremony LIVE : मनोहर लाल खट्टर यांनी शपथ घेतली

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शपथ घेतली आहे.

Narendra Modi speech live today : एस. जयशंकर यांनी घेतली शपथ

माजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi speech live : निर्मला सीतारमन यांनी घेतली शपथ 

माजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi Oath Taking Ceremony LIVE : शिवराज सिंह चौहान यांनी घेतली शपथ

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi oath live : जे. पी. नड्डांनी घेतली शपथ

भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Narendra Modi Oath Ceremony live updates : नितीन गडकरी यांनी घेतली शपथ

नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Modi Swearing in Ceremony live updates : अमित शाह यांनी घेतली शपथ

अमित शाह यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी ते गृहमंत्रीपदावर कार्यरत होते.

Modi oath-taking ceremony LIVE updates : राजनाथ सिंह यांनी घेतली शपथ

राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Modi Swearing in Ceremony live updates : तिसऱ्यांदा मोदींनी घेतली शपथ

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली आहे.

Narendra Modi Oath Taking Ceremony LIVE : मोदी राष्ट्रपती भवनात दाखल

नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्याला सुरूवात होणार...

Narendra Modi oath live :  नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शाह, गडकरी घेणार शपथ; क्रम ठरला

नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, आणि नितीन गडकरी शपथ घेतील. चौथ्या क्रमांकावर जे. पी नड्डा आणि पाचव्या क्रमांकावर शिवराज सिंह शपथ घेणार आहेत.

Modi Swearing in Ceremony live updates : चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुरली मनोहर यांची भेट

राष्ट्रपती भवन येथे चंद्राबाबू नायडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली.

Modi oath-taking ceremony LIVE updates : शाहरूख खान अन् मुकेश अंबानी यांची उपस्थिती

अभिनेता शाहरूख खान, उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहचले आहेत.

Modi oath-taking ceremony LIVE updates : विक्रांत मॅसी अन् राजकुमार हिराणींची शपथविधीला उपस्थिती...

अभिनेता विक्रांत मॅसी आणि राजकुमार हिराणी यांनीही मोदींची शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आहे.

Modi Oath Ceremony LIVE : शपथविधी सोहळ्याला खिलाडीची उपस्थिती...

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार यानं उपस्थिती लावली आहे.

Narendra Modi Swearing-In Ceremony LIVE : जीतन मांझी आणि जयंत चौधरी शपथविधीसाठी पोहोचले

शपथविधीसाठी मंत्री पोहोचणे सुरू झाले आहेत. मंचावर जीतन मांझी आणि जयंत चौधरी बसलेले दिसत आहे.

Narendra Modi oath live : प्रवीण तरडे यांच्या दुबईतून मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा

"खरंतर हा भावनिक क्षण आहे. आम्ही एकत्र राहिलो मोठे झालो. मुळशीतील मुठा आणि जातडे गावात लहानाचे मोठे झालो.. लहानपणाचा मित्र आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतोय, ही आमच्यासाठी मित्र म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. मुरलीधर अण्णा तुला खूप खूप शुभेच्छा... दुबई मधून तुला घट्ट मिठी...हा संपूर्ण पुणेकरांचा अभिमान आहे," असं दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी म्हटलं.

Modi Swearing in Ceremony live updates : एस. जयशंकर उपस्थित...

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याला भाजप नेते एस. जयशंकर यांनी उपस्थिती लावली आहे.

Modi oath-taking ceremony LIVE updates : नवीन मंत्र्यांनी अद्भूत काम करावे, अनुराग ठाकूर

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं, नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी मी त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. सर्व मंत्री अद्भूत कार्य करून पुढील 5 वर्षात देशाला पुढे नेतील.

Modi Oath Ceremony LIVE  :महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना मोदी सरकारमध्ये संधी

नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ 'मोदी 3.0 सरकार'मध्ये शपथ घेणार आहेत.

India PM Swearing In Ceremony Live : राज्यसभेचे 3 सदस्य होणार - अजित पवार

मोदींच्या शपथविधीला आम्ही हजेरी लावणार आहोत. आम्हाला कॅबिनेटमंत्रिपद हवं होतं. पण, राज्यमंत्रिपद मिळत असल्यानं नाकारलं. आम्ही काही काळ वाट बघू, पण आम्हाला कॅबिनेटमंत्रिपद हवं, असं अजित पवारांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' सरकार स्थापन होत आहे. जवाहरलाल नेहरा यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 240 जागा जिंकल्या तर एनडीए आघाडीने 294 जागा जिंकल्या. शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मल्लिकार्जुन खर्गेंही शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यासह शेजारील देशांतील पंतप्रधान आणि मंत्रीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com