PM Modi on Congress Defeat in Delhi Election Sarkarnama
देश

Modi on Congress Double hat trick: ''दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने केली शून्याची डबल हॅटट्रिक'' ; मोदींनी लगावला हटके टोला!

PM Modi on Congress Defeat in Delhi Election : ''काँग्रेस एक परजीवी पार्टी बनली आहे, जी स्वत: तर डुबतेच पण आपल्या सहकाऱ्यांनाही डुबवते.'' असंही मोदींनी म्हटलं आहे..

Mayur Ratnaparkhe

Narendra modi on Delhi Assembley Election 2025 Result : ''आज दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला कडक संदेश दिला आहे. दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसने शुन्याची डबल हॅटट्रिक केली आहे. देशाच्या राजधानीत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा सलग सहावेळेपासून खातंही उघडत नाही आणि हे लोक स्वत:ला पराभवाचं सुवर्णपदक देत फिरत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की, काँग्रेसवर देश विश्वास ठेवायला अजिबात तयार नाही.'' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजायनंतर भाजपच्या मुख्यलायातून केलेल्या भाषणात मोदींनी भाजप कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानत त्यांना संबोधित केले.

याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी(PM Modi) काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, ''मागील वेळी मी सांगितलं होतं, की काँग्रेस एक परजीवी पार्टी बनली आहे. ती स्वत: तर डुबतेच आपल्या सहकाऱ्यांनाही डुबवते. काँग्रेस एकामागून एक आपल्या सहकाऱ्यांना संपवत आहे. त्यांची पद्धतीही अतिशय मजेशीर आहे, आजची काँग्रेस आपल्या सहकाऱ्यांची जी भाषा आहे, जी त्यांची धोरणं आहेत ती चोरत आहे. त्यांचे मुद्दे चोरते आणि मग त्यांच्या व्होट बँकेत फूट पाडते.''

तसेच ''उत्तर प्रदेशात काँग्रेस(Congress) ती व्होट बँक हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावर समाजवादी पार्टी आणि बसपा आपला हक्क सांगत होते. मुलायमसिंह यांना हे बरोबर समजले होते. अशाचप्रकारे तामिळनाडूत आज डीएमकेची भाषा दुप्पट जोराने बोलत आहे. त्यांना डीएमकेच्या मतदारांना आमिष दाखवून स्वत:चं अस्तित्व बनववायचं आहे. बिहारमध्येही असंच आहे. काँग्रेस अशी आहे जी जातीयवादाचं विष पसरवून आपला सहकारी पक्ष राजदचं जे पेटंट आहे, तीच जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहे. अशाचप्रकारचा हाल जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसने आपल्या सहकाऱ्यांचा केला आहे. आता दिल्लीतही हे स्पष्ट झाले की, जो कोणी काँग्रेसचा हात एकदा पकडतो त्यांचं उध्वस्त होणं निश्चित होतं.'' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

याशिवाय, ''जे राजकारणाचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी मी एक काम सोडतोय, हे बघा त्यांनी 2014 नंतर पाच-सात वर्षांपर्यंत हा प्रयत्न हिंदू बनण्याचा प्रयत्न केला. मंदिरांमध्ये जाणं, गळ्यात माळा घालणं, पूजा करणं विविध प्रकारे प्रयत्न केले. कारण, त्यांना वाटलं की हे केल्याने भाजपच्या(BJP) व्होट बँकेत फूट पाडून आपण काहीतरी पदरात पाडून घेवू. परंतु त्यांची दाळ काही शिजलीच नाही. मग तुम्ही बघितलं असेल की मागील काही वर्षांपासून त्यांनी तो मार्ग बंद केला. त्यांनी मान्य केलं की हे भाजपचं क्षेत्र आहे, तिथे पाय ठेवू शकत नाही.'' असा टोला मोदींनी लगावला.

तर, ''मग जायचं तर जायचं कुठं, तर ही राज्यांमधील जे वेगवेगळे पक्ष आहेत. आपल्या छोट्याछोट्या मुद्य्यांवर ज्या पक्षांचा जीव आहे, त्यांच्यावर आता काँग्रेसची नजर आहे. परंतु आता त्यांनाही लक्षात आलं असेल, ते बोलून दाखवत नसतील. परंतु समजले असतील की काँग्रेस त्यांनाच खात आहे. इंडी आघाडीतील पक्ष आता काँग्रेसची ही खेळी समजू लागले आहेत. इंडी आघाडीतील पक्षाना याची जाणीव झाली आहे की, जी व्होट बँक त्यांनी काँग्रेसकडून हिसकावली होती, आता काँग्रेस ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात लागली आहे.'' असं मोदींनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर ''म्हणूनच तर दिल्लीत आपण बघितलं की इंडी आघाडीच्याच पक्षांनी एकजुट होवून काँग्रेसला त्यांच पात्रता दाखण्याचा प्रयत्न केला. आपली व्होट बँक रोखण्याचा प्रयत्न केला. इंडी आघाडी पूर्णपणे आधीपासूनच काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरली होती. तरीही काय हालं झाले बघा दोन्हीकडे. ते काँग्रेसला अडवण्यात तर यशस्वी ठरले, परंतु आपदाला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.'' अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला त्यांच्या दारूण पराभवार जोरदार टोले लगावले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT