Manoj Tiwari and BJP Delhi CM Face : ...म्हणून दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्रिपदासाठी मनोज तिवारींचे नाव सर्वाधिक चर्चेत!

Manoj Tiwari Name in Discussion for BJP Delhi CM Post : जाणून घ्या, मनोज तिवारी यांची राजकीय वाटचाल आणि वैयक्तिक आयुष्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती
Manoj Tiwari
Manoj TiwariSarkarnama
Published on
Updated on

Manoj Tiwari Political and Personal Life : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. तब्बल 27 वर्षे म्हणजे अडीच दशकाहून अधिक काळानंतर भाजप दिल्लीत पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. तर आम आदमी पार्टी विजयाची हॅटट्रिक करण्यात अपयशी ठरली आहे. भाजपच्या या विजयानंतर आता दिल्लीत भावी मुख्यमंत्री कोण असणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर काही भाजप नेत्यांची नावे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये दिल्लीतील भाजपचे दिग्गज नेते मनोज तिवारी यांचेही नाव आहे.

कारण, मनोज तिवारी(Manoj Tiwari) या नावाला प्रसिद्धीचे वलय आहे आणि त्यांचा चाहतावर्गही मोठ्याप्रमाणावर आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. यामध्ये त्यांनी शीला दिक्षीत, कन्हैय्या कुमार यांचा पराभव करून भाजपची इमेज वाढवलेली आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्ली भाजप अध्यक्षपदावर आणि संघटन प्रमुख पदावरील कामाचाही अनुभव आहे.

Manoj Tiwari
Delhi BJP CM Face News : अडीच दशकांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेवर येणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण?

मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा सर्वस्वी भाजपचे(BJP) नेतृत्वच घेणार आहे, असे मनोज तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दिल्लीचे तख्त राखलेला भाजप मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार? चर्चेतील चेहऱ्याला संधी देणार की धक्कातंत्र वापरत नवीन नाव समोर येणार हे लवकरच समजणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलेल्या मनोज तिवारींच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याबाबत आपण जाणून घेऊयात.

मनोज तिवारी यांची राजकीय वाटचाल -

मनोज तिवारी हे उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. याचबरोबर ते प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि अभिनेतेही आहेत. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे(Samajwadi Party) उमेदवार म्हणून 2009 सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा योगी आदित्यनाथ यांच्याकडून पराभव झाला होता. यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या रूपात निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले.

भाजपने त्यांना 2016मध्ये दिल्ली भाजप अध्यक्ष पदावर नियुक्त केले होतं. याशिवाय ते दिल्लीत भाजपचे संघटन प्रमुखही होते, जेव्हा भाजपने 2017च्या एमसीडी निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला होता. 2019मध्ये मनोज तिवारी यांनी दिल्ली काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा तीन लाखांहून अधिक मताधिक्क्यांनी पराभव करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. पुढे 2024 लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारी आणि काँग्रेसच्या कन्हैय्या कुमार यांची थेट लढत होती. यामध्ये मनोज तिवारी मोठ्या फरकाने विजयी झाले होते आणि विजयाची हॅटट्रिक केली होती.

Manoj Tiwari
Anna Hazare on Arvind Kejriwal Defeat: अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला? , अण्णा थेटच म्हणाले, ''दारू डोक्यात शिरली ना...''

मनोज तिवारी यांचे खासगी आयुष्य -

मनोज तिवारी यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1971रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील कबीर चौरा भागात झाला होता. ते चंद्रदेव तिवारी आणि ललिता देवी या दाम्पत्याच्या सहा अपत्यांपैकी एक आहेत. ते बिहारमधील कैमुर जिल्ह्यातील अतरवलिया गावचे रहिवासी आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एम.पी.एड ची पदवी मिळवली आहे.

राजकारणता पदार्पणाआधी त्यांनी भोजपुरी चित्रपट क्षेत्रात एक गायक आणि अभिनेते म्हणून अनेक वर्ष काम केलं. 2003मध्ये त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेला चित्रपट ससुरा बडा पैसावाला मध्ये अभिनेता म्हणून केलं. यानंतर मग त्यांनी दरोगा बाबू आय लव यू आणि बंधन टूटे ना या हीट चित्रपटातही काम केलं. 2010मध्ये मनोज तिवारी रिअलटी टेलिव्हिजन शो बिग बॉसच्य चौथ्या सीजनमध्ये एक स्पर्धक म्हणून दिसले. याशिवाय मनोज तिवारी यंनी गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ''जिया हो बिहार के लाला जिया तू हजार साला'' हे गाणं गायलं होतं.

मनोज तिवारी यांनी त्यांची पहिली पत्नी राणी यांच्याशी 1999मध्ये विवाह केला होता आणि त्यांना जिया नावाची मुलगी देखील आहे. मात्र 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर मग त्यांनी सुरभी यांच्याशी विवाह केला आणि त्यांची एक मुलगी देखील आहे.

मनोज तिवारी यांनी रामलीली मैदानात रामदेव यांच्या उपोषणाचेही समर्थन केले आणि अण्णा हजारे यांच्या अटकेचा जाहीरपणे निषेधही केला होता. पुढे मग त्यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवत आम आदमी पार्टीच्या आनंद कुमार यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा ते खासदार झाले होते. आता त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com