mallikarjun kharge-Amit saha-Narendra modi
mallikarjun kharge-Amit saha-Narendra modi Sarkarnama
देश

मोदी, शहांनी माझ्या पराभवाचा कट रचला

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत गुलबर्ग्यामधून आपल्या पराभवाला मतदारसंघातील लोक किंवा मतदार जबाबदार नव्हते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नेत्यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाचा कट रचला होता, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते, तथा काँग्रेस नेते एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. (Modi, Shah plotted my defeat : Mallikarjun Kharge)

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे प्रथमच गुलबर्गा शहराच्या दौऱ्यावर आले होते. खर्गे यांचा सत्कार करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आली आहे. त्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते खर्गे बोलत होते. यावेळी राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

नरेंद्र मोदींनी मला लोकसभा निवडणुकीपूर्वी माझ्या पराभवाचे संकेत दिले होते. कारण, विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत माझ्या कामगिरीची त्यांना भीती वाटत होती. संसदेतील माझी कामगिरी त्यांनी लोकशाही भावनेने घेतली नाही, माझ्याबद्दल ते सूडभावनेने वागले. माझा लढा सर्वसमावेशक विकास, दबलेल्यांची, वंचित लोकांची उन्नती आणि संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वांच्या संरक्षणासाठी आहे, असेही खर्गे या वेळी बोलताना म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्ष्य हे ध्रुवीकरण आणि जातीय धर्तीवर लोकांमध्ये फूट पाडणे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून जनतेसाठी निर्माण केलेली मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे, असा आरोपही मल्लिकार्जून खर्गे यांनी बंगळूरमध्ये बोलताना केला. काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजनांची नावे बदलण्याच्या केंद्राच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT