Drops of Mohammad Iqbal from Political Science NEWS
Drops of Mohammad Iqbal from Political Science NEWS Sarkarnama
देश

DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ लिहिणारे इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर ; सावित्रीबाई फुलेंचा समावेश..

सरकारनामा ब्यूरो

DU Political Science: दिल्ली विद्यापीठाने कवी मोहम्मद इक्बाल यांना अभ्यासक्रमातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे. इक्बाल यांच्यावरील पाठ बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवला जात आहे. त्या ऐवजी आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. (Academic council Proposed drops of Mohammad Iqbal from political science syllabus Delhi University )

त्यामुळे दिल्ली विद्यापीठात आता 'सारे जहाँ से अच्छा' लिहिणारे इक्बाल यांच्यावरील पाठ अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठाची अधिसभा नुकतीच झाली. यात विद्यापीठाचे कुलगुरु दिनेश सिंह यांनी ही माहिती दिली.

दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीनंतर कवी इक्बाल अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य काही प्रस्तावांनाही अधिसभेनं मंजुरी दिली आहे. यापुढे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात फक्त राष्ट्रीय व्यक्तींचाच समावेश असेल, असा निर्णय अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कुलगुरु दिनेश सिंह यांनी सांगितले.

इक्बाल यांनी मुस्लिम लीग आणि पाकिस्तान आंदोलनाच्या समर्थनार्थ गाणी लिहिली आहेत. भारताचे विभाजन आणि पाकिस्तान स्थापनेचा विचार सगळ्यात अगोदर इक्बाल यांनी मांडला होता. अशा व्यक्तींच्या चरित्राबाबत शिकवण्यापेक्षा देशातील आदर्श व्यक्तीबाबतच्या माहितीचा समावेश करण्यात येणार आहे, असे कुलगुरु दिनेश सिंह यांनी सांगितले. नऊ जून रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

बीए राज्यशास्त्राच्या पुस्तकार ११ प्रकरणे आहेत. यात राजा राममोहन राय, रमाबाई आंबेडकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गाँधी, डाँ. भीमराव आंबेडकर आदींचा समावेश आहे. या पुस्तकात आता सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या पाठाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा’ हे गाणे इक्बाल यांनी लिहिले आहे. त्यांना अल्लामा इक्बाल असेही म्हणतात. इक्बाल यांना पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी म्हटले जाते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT