Karnataka Politics : भाजपने घेतलेले काही निर्णय कर्नाटकच्या नवीन सरकारने रद्द करण्यास सुरवात केली आहे. कट्टरपंथियांनी भाजप कार्यकर्ता प्रवीण नेट्टारु यांचा खून केला होता. (karnataka siddaramaiah government withdraws appointment order praveen nettaru wife nuthana kumari job)
त्यानंतर बोम्मई सरकारने प्रवीण नेटारु यांच्या पत्नी नूतन कुमारी (Nuthana Kumari) यांना अस्थायी स्वरुपात सरकारी नोकरी दिली होती.
सत्ताबदल होताच नुतन कुमारी यांना आता या नोकरीवरुन हटविण्यात आले आहे. या प्रकरणानंतर कर्नाटकातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणावरुन त्यांनी सिद्धरामय्या सरकारचा निषेध केला आहे. पीएफआयच्या दहशतवाद्यांनी प्रवीण नेट्टारु यांचा खून केल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने त्यांची पत्नी नूतन कुमारी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नोकरी दिली होती.
मंगलुरु येथील उपायुक्त कार्यालयात मुख्यमंत्री निधी कार्यालयात वरिष्ठ सहायक पदी नूतन कुमारी यांची नियुक्ती केली होती. काँग्रेसने आता विधवा महिलेला नोकरीवरुन हटवलं आहे. त्यांनी नोकरीवरुन का हटवलं याचं स्पष्टीकरण अद्याप सिद्धरामय्या सरकारने केलेले नाही.
सरकार बदलल्यावर अशा प्रकारच्या अस्थायी नोकरी असलेल्यांना कर्मचाऱ्यांना नोकरीचा राजीनामा देण्यासाठी सांगितले जाते. पण नूतन कुमारी यांनी थेट नोकरीवरुन हटविण्यात आले आहे. काँग्रेसने घेतलेला हा निर्णयावर भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेश सचिव विष्णु वर्धान रेड्डी यांनी टि्वट करीत काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका विधवा महिलेविषयी काँग्रेसने व्यक्त केलेली ही क्रुरता आहे. या माध्यमातून सरकारने त्यांचे पीएफआयबाबत आपले प्रेम व्यक्त केलं आहे, असे रेड्डी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटंल आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक सरकारने घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रवीण नेट्टारु यांच्या पत्नीला नोकरीवरुन हटविताना सिद्धरामय्या यांना लाज वाटायला पाहिजे होती, असे टि्वट मालवीय यांनी केलं आहे.
पोल्ट्री व्यावसायिक प्रवीण नेट्टारु हे घरी येत असताना पीएफआयच्या दहशतवाद्यांनी २६ जुलै २०२२ रोजी त्यांच्यावर हत्या केला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.