Mohammed Siraj Sarkarnama
देश

Mohammed Siraj Controversy : सिराजला संघातून डच्चू, राजकारणात भडका! नसीम सिद्दीकींचा अमित शाह यांच्या मुलावर निशाणा; 'भेदभावाचे उत्तर द्या!'

Mohammed Siraj Controversy: Naseem Siddiqui questions Siraj exclusion from India playing XI against New Zealand and raises discrimination allegations against the BJP government : इम्रान मसूद यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नसीम सिद्दीकी आक्रमक; 'अब्दुलला बाजूला सारणे म्हणजे देशाचे नुकसान', मुस्लिम आयपीएस अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांचाही केला उल्लेख.

Pradeep Pendhare

Mohammed Siraj Dropped From Playing XI : वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला अंतिम 11 खेळाडूंमधून वगळल्याचा मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी यांनी, अल्पसंख्याकांशी भेदभाव होत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे, मुस्लिम आयपीएस अधिकाऱ्यांनीही भेदभावातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, अमित शाह साहेबांच्या मुलाच्या कार्यपद्धतीवर भेदभावाचे प्रश्न उपस्थित होतात, अशी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी म्हणाले, "काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती सत्य अशीच आहे. ती नाकारता येणार नाही. अल्पसंख्याकांशी भेदभाव होत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मग ते शिक्षणाचे क्षेत्र असो, क्रीडा, राजकारण किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो!" अनेक मुस्लिम आयपीएस अधिकाऱ्यांनीही आपल्याला भेदभावाचा सामना करावा लागत असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे राजीनामे दिले किंवा स्वेच्छानिवृत्ती (VRS) स्वीकारली, असेही आपण पाहिल्याचे नसीम सिद्दीकी यांनी म्हटले.

सिराजने चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान मिळाले नसेल, तर एनडीए सरकार, भाजप (BJP) सरकार आणि अमित शाह साहेबांच्या मुलाच्या कार्यपद्धतीवर भेदभावाचे प्रश्न उपस्थित होतात. सरकारने या प्रकरणाची योग्य प्रकारे दखल घ्यावी. यावर सरकारने उत्तर द्यावे आणि खेळाडूंची निवड नेमक्या कोणत्या निकषांवर केली जाते, याबाबत पारदर्शकता आणावी, अशी मागणी नसीम सिद्दीकी यांनी केली.

तुम्ही अब्दुलला बाजूला सारले, तर ते केवळ अब्दुलचे नुकसान नसते, तर देशाचेही नुकसान असते. कारण एखादा खेळाडू स्वतःसाठी किंवा आपल्या समुदायासाठी खेळत नसतो, तर तो देशासाठी खेळत असतो, असा टोलाही नसीन सिद्दीकी यांनी सरकारला लगावला.

काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी,"सिराजच्या नावाशी आणि ओळखीशी संबंध जोडून, ​​त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असूनही सिराजला बाकावर बसवणे अनाकलनीय आहे." त्याचे नाव सिराज आहे, म्हणजेच तो मुस्लमान आहे, हे पुरेसे कारण नाही का? जर तो चांगली कामगिरी करत असूनही त्याची निवड होत नसेल, तर दुसरे काय कारण असू शकते? हेच एकमेव कारण असू शकते, दुसरे कोणतेही कारण नाही, असा घणाघात खासदार मसूद यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT