SIR voter list issue : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक मिळवत सत्ताधारी तृणमूल काँगेसचा सुपडा साफ केला. भाजपच्या या विजयामध्ये मतदारयादी पुनर्पडताळणी मोहिमेचा म्हणजेच SIR चा मोठा वाटा असल्याचा आरोप आता विरोधी पक्षांकडून केला जात आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच या प्रक्रियेतून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यावरून राज्यात मोठा गोंधळही झाला होता.
निवडणुकीआधी काँग्रेसचे नेते मोताब शेख यांनाही एसआयआरचा फटका बसला होता. प्रचाराची तयारी करत असतानाच सुधारित मतदारयादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. निवडणूक आयोगाने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत हात झटकले. त्यानंतर शेख यांनी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला.
सुप्रीम कोर्टाने शेख यांचे प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अपिलीय प्राधिकरणाला दिले. प्राधिकरणाने त्यांचे दावा योग्य ठरवत पुन्हा मतदारयादीत नाव समाविष्ट केले. तब्बल २७ लाख अर्जदारांपैकी यादीत समाविष्ट झालेले ते पहिले ठरले होते. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याच्या एक दिवस आधी प्राधिकरणाचे काम सुरू झाले होते.
प्राधिकरणाने शेख यांच्याकडे आवश्यक पुरावे असल्याचे सांगत त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याचे आदेश काढले. त्यानंतर काही तासांतच शेख यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळवत फराक्का उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत शेख यांनी आठ हजार मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सुधीर चौधरी यांना पराभूत केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले असून त्यापैकी शेख एक आहेत. तर राणीनगर मतदारसंघातील जुल्फीकार अली विजयी झाले आहे. या दोन विजयी आमदारांमुळे राज्यात काँग्रेसला आपली प्रतिष्ठा राखता आली आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. यावर्षी काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे पक्षाचा मतांचा टक्काही यावेळी वाढला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी, माजी खासदार मौसम नूर यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.