New Delhi News : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासह मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये काँग्रेसही मागे नाही. काँग्रेसने एनडीएला मोठा झटका देताना माऊंटन मॅनच्या मुलालाच आपल्या पक्षात आणले आहे. तसेच एका माजी खासदारानेही काँग्रेसचा हात हातात घेतला.
'माऊंटन मॅन' म्हणून देशभरात प्रसिध्द असलेले दशरथ मांझी यांचे पुत्र भगीरथ मांझी यांनी नितीश कुमार यांच्या पक्षाला आज रामराम ठोकला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा नितीश कुमारांना निवडणुकीआधी धक्का मानला जात आहे. मांझी यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाची सदस्यता घेतली.
भगीरथ मांझी हे बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर गावातील आहे. वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. वंचितांना सशक्त बनविण्यासाठी आपण काम करत राहणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पक्ष प्रवेश कार्यक्रमामध्ये आप आणि भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आम आदमी पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते निशांत आनंद, ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम समाजचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार अली अनवर अंसारी, भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते निखत अब्बास, प्रसिध्द हृदयविकास तज्ज्ञ जगदीश प्रसाद आदींनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अंसारी यांना जेडीयूने राज्यसभेवर पाठवले होते. त्यामुळे हाही नितीश कुमारांसाठी मोठा झटका आहे.
दरम्यान, दिल्लीत आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होत आहे. तिन्ही पक्षांकडून इतर पक्षांनी नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची चढाओढ अजूनही सुरू आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान असून प्रचारही शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत आपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपनेही आपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. काँग्रेसने दोन्ही पक्षांविरोधात दंड थोपटले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.