Pankaja Munde News : पंकजा मुंडेंचे वाल्मिक कराडविषयीचे ‘ते’ विधान पुन्हा चर्चेत; सुरेश धस यांनी जोडले कनेक्शन

BJP MLA Suresh Dhas Minister Dhananjay Munde Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड आणि एका महिला पोलिस अधिकाऱ्यामधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Pankaja Munde, Suresh Dhas, Walmik Karad
Pankaja Munde, Suresh Dhas, Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोप वाल्मिक कराड आणि एका महिला पोलिस अधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून भाजप नेते व आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणातील वाल्मिक कराडविषयीच्या विधानाची आठवण काढत मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

सुरेश धस यांनी मंगळवार मीडियाशी बोलताना यावर भाष्य केले आहे. मागील वर्षी भगवात भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला होता. यावेळी या मेळाव्याला सुरेश धसही उपस्थित होते. त्याचप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे, महादेव जानकर आणि भाजपचे इतर काही आमदारांनीही हजेरी लावली होती. तर वाल्मिक कराडही स्टेजजवळ इतर लोकांसोबत दिसला होता.

Pankaja Munde, Suresh Dhas, Walmik Karad
Yogesh Kadam : पालकमंत्रिपदाच्या वादात आणखी एका मंत्र्यांची उडी; योगेश कदम यांचा 'रायगड'वर दावा!

पंकजा मुंडे यांनी स्टेजवर उपस्थितांची ओळख करून देताना सुरूवातीलाच धनंजय मुंडे यांचे नाव घेतले होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री माझे भाऊ धनुभाऊ, असा त्यांचा उल्लेख पंकजा मुंडेंनी केला होता. त्यानंतर त्यांनी इतर उपस्थितींचीही ओळख करून दिली. लक्ष्मण हाके हेही यावेळी उपस्थित होते.

हाके यांनी उभे राहून हात जोडत अभिवादन केले. त्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, ‘त्यांनी स्वत:हून इथे येण्याचा निर्णय घेतला. हे वाल्मिक अण्णानी बोलवलंय. मी काय म्हणलं, माझ्या दसऱ्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. माझा सन्मान ठेवून आलेल्या हाकेंचे मी स्वागत करते.’   

Pankaja Munde, Suresh Dhas, Walmik Karad
Amitabh Gupta News : भाजप नेत्याचे गंभीर आरोप, पुण्याचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या अडचणीत वाढ; 'एसीबी' करणार चौकशी?

पंकजा मुंडे यांनी इतर अनेकांची नावे घेतली. बराचसा वेळ त्यांनी नावे घेण्यातच घालवला होता. नावे घेतल्यानंतर शेवटी भाषणाला सुरूवात करण्याआधी त्यांनी आपल्या डाव्या बाजूला पाहत कुठंय रे ते, असे म्हटले. लोकांमध्ये बसलेल्या वाल्मिक कराडकडे कॅमेरा वळतो. ‘ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

सुरेश धस यांनी आज मीडियाशी बोलताना याच विधानाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, आमच्या पंकजाताईंनी यावर्षीच्या भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात एका वाक्य वापरले होते. ‘ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही, असे वाल्मिक अण्णा’, हे तुमच्याकडे सेव्ह असेल तर ते वाक्यही काढून ठेवा. कारण आजचा जो फोन त्या लेडीजचा झाला आहे, तो अतिशय भयानक प्रकरणामधील आहे. ते पानही धनंजय मुंडेंशिवाय हललंय की नाही, हे मला बघायचंय, असे निशाणा धस यांनी साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com