Farooq Abdullah Sarkarnama
देश

India Vs Pakistan : ...तर काश्मीरची स्थिती गाझासारखी होईल! फारुख अब्दुल्लांना का सतावतेय भीती?

Farooq Abdullah : भारत-पाकिस्तानमध्ये संवाद नसल्याने नाराजी...

Rajanand More

Jammu and Kashmir News : जम्मू आणि काश्मीरच्या मुद्यावरून नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार फारूख अब्दुल्ला यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या मुद्यावर पाकिस्तान आणि भारताने संवादातून मार्ग न काढल्यास आपली स्थितीही गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी होईल, अशी भीती अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ पंतप्रधान बनणार असल्याचे भाकितही त्यांनी वर्तविले.

माध्यमांशी संवाद साधताना फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी ही भीती व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक (Election) असून सध्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अब्दुल्ला यांनीही शरीफ हेच पंतप्रधान होतील, असे सूचक वक्तव्य केले आहे.

आपण आपले मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही, असे अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) म्हणायचे. शेजाऱ्यांशी आपले मित्रत्वाचे संबंध राहिले तर दोघांचीही प्रगती होते, असे सांगत अब्दुल्ला (Farooq Abdullah) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींही (Narendra Modi) आता युध्द हा पर्याय नसल्याचे बोलतात. संवादातूनच मार्ग निघू शकतो, यावर त्यांचाही विश्वास आहे. पण चर्चा होताना दिसतच नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनू शकतात, असे सांगून अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले. भारताशी संवाद साधायला तयार आहोत, असे शरीफ म्हणत आहेत. पण आपण बोलण्यासाठी तयार नाही. यामागचे नेमके कारण काय आहे? आपण जर संवादातून यावर मार्ग काढला नाही तर गाझा आणि पॅलेस्टाईनसारखी स्थिती आपली होईल. इस्त्रायलकडून त्यांच्यावर बॉम्ब टाकले जात आहेत, असे अब्दुल्ला यांनी नमूद केले.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान आणि नवाज शरीफ यांच्या पक्षात जोरदार टक्कर होणार असल्याचे चिन्ह आहे. इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर काही महिन्यांतच ही निवडणूक होत आहे. बेरोजगारी, महागाई, बिकट आर्थिक स्थिती अशा विविध कारणांमध्ये सध्या पाकिस्तान त्रस्त आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे भारताचेही लक्ष लागले आहे.

Edited by Rajanand More

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT