Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी वृंदा कारत यांची मोठी घोषणा

Brinda Karat : 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
Brinda Karat, Ram Mandir
Brinda Karat, Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Inauguration : अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात अजून 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून देशभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रित केले जात आहे. त्यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. काही बड्या नेत्यांना अद्याप निमंत्रण न मिळाल्याने नाराजीनाट्यही सुरू आहे. त्यावरून राजकारणही रंगले आहे.

इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक नेत्यांनी भाजप (BJP) सरकारकडून राम मंदिराचा (Ram Mandir) इव्हेंट केला जात असल्याची टीका होत आहे. त्यातच आता कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी) (CPI) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Brinda Karat, Ram Mandir
Pakistan Elections : पाकिस्तानात घडणार इतिहास; पहिल्यांदाच हिंदू महिला उतरली निवडणुकीच्या रिंगणात

पक्षाच्या वरिष्ठ नेत्या वृंदा कारत (Brinda Karat) यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, आमचा पक्ष धार्मिक भावनांचा आदर करतो. पण भाजपकडून या भावनांचे राजकारण केले जात आहे. हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनीही भाजपवर टीका केली आहे. भगवान रामाची जी शिकवण आहे, त्याच्या अगदी विपरित भाजपकडून केले जात आहे. या सोहळ्याचा इव्हेंट करण्यात आला आहे. माझ्या हृदयात राम आहे. त्याचे प्रदर्शन करण्याची मला गरज नाही. माझ्या हृदयात राम आहे आणि मला संपूर्ण आयुष्यभर रामानेच मार्ग दाखविला असेल तर मी काहीतरी योग्य केले असेल, असे म्हणत सिब्बल यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश भाजपच्या दोन दिवसांच्या पदाधिकारी बैठकीत राम मंदिर उभारणीबाबत आयोजित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन सर्व नेते व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर परिसराला फुलांनी सजविण्याच्या, तसेच रोषणाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे हा सोहळा डोळे दीपवणारा ठरणार आहे.

Brinda Karat, Ram Mandir
Madhya Pradesh Politics : ज्योतिरादित्य शिंदेंचे पाय धरले अन् कॅबिनेटमध्ये समावेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com