MP High Court Judge Duppala Venkata Ramana sarkarnama
देश

Justice Duppala Venkata Ramana : ''मला त्रास देण्यासाठीच माझी बदली केली गेली'' ; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा जाहीरपणे दावा!

MP High Court Judge Duppala Venkata Ramana accuses judiciary : निरोप समारंभात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर व्यक्त केली नाराजी ; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Serious Allegations by MP High Court Judge : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दुप्पाला व्यंकट रमणा यांनी निवृत्तीआधीच आपल्या समोरोपाच्या भाषणात मनातील खदखद व्यक्त केली. इंदुरमध्ये आयोजित समारंभात रमणा यांनी म्हटले की, २०२३मध्ये गृह राज्य आंध्रप्रदेशातून चुकीच्या हेतूने त्यांची बदली मध्यप्रदेश उच्च न्यायालयात केली गेली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्य कॉलेजियमकडे विनंती करूनही माझं म्हणणं ऐकलं गेलं नाही.

न्यायाधीश रमणा यांनी म्हटले की, हा माझ्या आयुष्यातील एक उल्लेखनीय काळ होता, परंतु मला विनाकारण आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून मध्यप्रदेश उच्चन्यायालयात स्थानांतरित केलं गेलं. त्यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी पीएनईएस (पॅरोक्सिस्मल नॉन-एपिलेप्टिक सीज़र्स) आणि कोविड नंतर मेंदूच्या संबंधी समस्यांनी त्रस्त होती. ज्यामळे त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा पर्याय निवडला होता, जेणेकरून त्यांच्या पत्नीला चांगला उपचार मिळू शकेल.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी १९ जुलै २०२४ रोजी आपल्या पत्नीच्या गंभीर वैद्यकीय स्थितीबाबत सांगत निवेदन सादर केले, परंतु यावर विचारही केला गेला नाही आणि ते फेटाळलेही गेले नाही.

अखेर रमणा यांनी आपल्या मनातील दु:ख व्यक्त करत म्हटले की, मला काहीही उत्तर मिळालं नाही. एक न्यायाधीश म्हणून मला किमान मानवी विचाराची अपेक्षा होती. मी अतिश निराश आणि दु:खी आहे. एवढंच नाहीतर त्यांनी हे मान्य केलं की, विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई कदाचित अधिक सहानुभूतीपूर्ण असले असते, परंतु ही सहानुभूती फार उशीरा आली कारण आता मी सेवानिवृत्त होत आहे.

एवढंच नाहीतर न्यायाधीश रमणा यांनी दावा केला की, त्यांची बदली चुकीच्या हेतूने आणि त्रास देण्यासाठी केली गेली. त्यांनी म्हटले की, मला स्पष्ट कारणांशिवाय आपल्या गृह राज्यातून स्थानांतरित केले गेले. मी त्यांचा अहंकार संतुष्ट करण्यात खूश आहे. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत, परंतु देव माफ करत नाही आणि विसरतही नाही. त्यांनाही कोणत्या ना कोणत्या रूपात त्रास सहन करावा लागेल.

न्यायाधीश रमणा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ऑगस्ट २०२३मध्ये त्यांना आंध्रप्रदेशातून मध्यप्रदेशात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर त्यांनी कर्नाटकसाठी विनंती केली, परंतु ती मान्य केली नाही आणि मध्यप्रदेशात स्थानांतरणाची शिफारस पुन्हा केली. रमणा म्हणाले की, मी माझ्या पत्नीला निमहान्स बंगळुरू येथे उपचार घेता यावे, यासाठीच कर्नाटकची निवड केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर विचार केला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT